खरं काय! शेतकऱ्यांना अनुदान स्वरूपात डिझेल देण्याच्या चर्चेला उधाण; मिळेल का खरंच अनुदान?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 04 एप्रिल 2022 Grants to farmers : देशात सर्वत्र गेल्या काही महिन्यांपासून सर्वसामान्यांना महागाईच्या झळा बसू लागल्या आहेत. पेट्रोल आणि डिझेलचे दर (petrol diesel price) तर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात आहेत.

यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबांचे कंबरडे मोडले आहे. आधीच इंधन दरवाढीचा फटका भारतीयांना मोठ्या प्रमाणात बसत होता त्यात आता रशिया आणि युक्रेन मध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे आगीत तेल ओतल्याप्रमाणे पेट्रोल आणि डिझेलचे दर भडकू लागले आहेत.

पेट्रोल डिझेल दरवाढीचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतोय, याचा मोठा आर्थिक भुर्दंड शेतकरी बांधवांना (Farmer) देखील सहन करावा लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात मोठी वाढ होणार असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.

शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात वाढ पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दराचा सर्वात जास्त फटका शेतकर्‍यांना बसत आहे. सध्या राज्यात आगामी खरीप हंगामासाठी पूर्वमशागतीचे (Pre-Cultivation) कार्य जोरावर सुरू आहेत. पूर्वमशागत करण्यासाठी नव्हे नव्हे तर पेरणीपासून ते काढणीपर्यंत सर्वच ठिकाणी शेतकरी बांधवांना ट्रॅक्टरची आवश्यकता भासत असते.

डिझेलच्या दरात वाढ झाली असल्यामुळे ट्रॅक्टरने करावयाची कामे महागली आहेत. पूर्वमशागत महागली असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. ट्रॅक्टर मालकांनी मशागतीचे सर्व कार्य प्रति एकरी 200 रुपयांपर्यंत वाढवले आहेत.

अनेक ट्रॅक्टर मालकांनी आता शेतकरी बांधवांकडून यापेक्षा अधिक रक्कम वसूल करायला सुरुवात केली आहे. यामुळे डिझेल महागाईच्या सर्वात जास्त झळा शेतकऱ्यांनाच बसत आहेत.

शेतीत सुरु असलेली कार्य सध्या राज्यात शेतकरी बांधव मशागतीची कार्य करीत आहेत. यामध्ये प्रामुख्याने नांगरणी केली जात आहे. असे सांगीतले जाते की उन्हाळ्यात नांगरणी केल्यामुळे उत्पादनात वाढ होत असल्याचा शेतकऱ्यांचा दावा आहे.

यामुळे सध्या नाशिक जिल्ह्यातील कळवण सटाणा मालेगाव देवळा या भागात नांगरणीचे कार्य जोरावर आहेत. आता शेतीची सर्व कामे ट्रॅक्टर चलित यंत्रांनी होऊ लागल्याने ट्रॅक्टरची गरज सर्व शेतकऱ्यांना भासत असते.

डिझेलवर अनुदानाची मागणी का? डिझेलच्या किमती आकाशाला गवसणी घालत असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात वाढ होत आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात वाढ झाली तर साहजिक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात घट येणार आहे.

सध्या मालेगाव तालुक्यात कांद्याची काढणी झाल्यानंतर शेतकरी बांधव नांगरणी करत आहेत. नांगरणीसाठी शेतकरी बांधवांना एकरी 2500 रुपये एवढा अधिक खर्च येत आहे. डिझेल दरवाढीचे कारणे पुढे करत ट्रॅक्टर चालक शेतकऱ्यांकडून मनमानी रक्कम वसुली करत आहेत.

यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. मित्रांनो मालेगाव तालुक्याप्रमाणेच इतरत्र देखील इंधन दरवाढीचे कारणे पुढे करून शेतकऱ्यांची लूट राबवली जात आहे. यामुळे आता शेतकरी बांधवांकडून डिझेल खरेदीसाठी अनुदानाची मागणी केली जात आहे.

मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, केवळ शेतकऱ्यांमध्येच डिझेल दरवाढीच्या अनुदानाबाबत चर्चा रंगल्या आहेत याबाबत कोणत्याही राजकीय पक्षाने किंवा सरकारने अधिकृतरित्या कुठलेच विधान केलेले नाही.