उद्यापासून लॉकडाऊनमध्ये काय सुरु, काय बंद? वाचा सविस्तर माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 9 एप्रिल 2021 :-महाराष्ट्रात कोरोना झपाट्याने वाढत असतानाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारतर्फे कडक निर्बंध लागू करून महाराष्ट्रात वीकेंड लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली.

आजपासून सरकारच्या वीकेंड लॉकडाऊनला सुरुवात होत आहे. राज्यात 30 एप्रिलपर्यंत मिनी लॉकडाऊन लागू आहे.

5 एप्रिल रात्री 8 पासून 30 एप्रिलपर्यंत रात्री 11.59 वाजेपर्यंत कडक निर्बंध असतील. पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यावर निर्बंध असणार आहेत.

बिग बझार, मॉल, रिलान्स असे सुपरमार्केट व अत्यावश्यक वस्तूंची विक्री करणारी आस्थापने सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत सुरू राहतील.

पण जिथं वेगवेगळ्या वस्तू विकल्या जातात ज्या अत्यावश्यक सेवेत येत नाहीत तर अशी आस्थापनं बंद असतील. विकेंड लॉकडाऊनमध्ये APMC मार्केट सुरू असतील.

पण जर तिथं कोरोना संसर्ग वाढण्याची भीती असेल तर स्थानिक प्रशासन राज्य सरकारच्या परवानगीनुसार एपीएमसी मार्केट बंद करू शकतं.

4 एप्रिलच्या शासन निर्णयानुसार नागरीक दारु होम डिलिव्हरी पद्धतीनं खरेदी करु शकतात. मात्र, निश्चित करण्यात आलेल्या वेळेतचं दुकानांकडून सेवा दिली जाईल.

उत्पादन शुल्क विभागाचे नियम पाळावे लागतीतल. एसी. कुलर, फ्रीज दुरुस्ती दुकानं सुरु नसतील. लॅपटॉप, मोबाईल, कॉम्प्युटरची दुकानं बंद असतील.

गॅरेज खुली असती पण शॉप बंद असतील. पण जर गॅरेजमध्ये कोरोना नियमांचं उल्लंघन होताना दिसलं तर मग ते बंद केले जातील.

रेस्टॉरंट आणि बार स्थानिक प्रशासनान लावलेल्या नियमांसह सकाळी 7 ते सायंकाळी 8 पर्यंत फक्त पार्सल सुविधेसह सुरु असतील.

स्थानिक प्रशासनाने ठरवून दिलेल्या वेळेनुसार रेस्टॉरंट्स आणि बार सुरू असतील पण तिथं बसता येणार नाही. या वेळेव्यतिरिक्त किंवा विकेंडला होम पार्सल नेता येणार नाही.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|