हिवरेबाजारला आल्यावर आम्हाला आमच्या भूमीची आठवण झाली..!

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News:इथे आल्यावर आम्हाला आमच्या भूमीची जम्मू काश्मीरची आठवण झाली. खरोखर तुम्ही निसर्ग आणि जलगंगा हिवरे बाजारच्या भूमीत निर्माण केली आहे.

हिवरे बाजारात जलसमृद्धी, वृक्षसमृद्धी, कृषिसमृद्धि आहे. असे प्रतिपादन काश्मीरमधील शुपियन या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष ओलामीर मुस्तार यांनी हिवरे बाजार मधील विकास पाहून आनंद व्यक्त केले.

लोकसहभागातून पंचायतराज व्यवस्थेला जम्मू काश्मिरमध्ये बळकटी देण्यासंदर्भात जम्मू काश्मिर येथील जिल्हा परिषद अध्यक्ष व सदस्य तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या शिष्टमंडळाने हिवरे बाजारला भेट दिली.

यावेळी ते बोलत होते. याभेटीदरम्यान हिवरे बाजारने कशा पद्धतीने लोकसहभागातून पंचायतराज व्यवस्थेचा उपयोग करून गाव घडविले, याचा अभ्यास करण्यासाठी या भेटीचे आयोजन केले होते.

याच धर्तीवर जम्मू काश्मिर मधील जिल्ह्यात तेथील भौगोलिक परिस्थिती व समस्यांचा विचार करून, लोकसहभागातून पंचायतराज व्यवस्था बळकट करणे व गावे सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने सक्षम करणे हा या भेटी मागचा हेतू होता.

काही काळापूर्वी उजाड आणि ओसाड हिवरे बाजार आज निसर्गरम्य आणि जलसमृध्द झाले आहे. दुष्काळाकडून समृद्धीकडे झालेला हा प्रवास पाहून आम्ही जम्मू काश्मीरचे जिल्हा परिषद अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी थक्क झाले.

शुपियन जिल्हा हा पुलवामा पासून ५० किलोमीटर अंतरावर आहे. पद्मश्री पोपटराव पवार यांनी सर्वांचे स्वागत केले व हिवरे बाजारच्या विविध कामांची माहिती दिली.

त्यावेळी शिष्टमंडळाने सांगितले पवार साहेब तुमचे भावी विचार ऐकून आणि तुमचे त्यागमय जीवनाचा आम्हाला अभियान वाटतो.

जम्मू काश्मीरमध्ये आदर्श व स्वावलंबी खेडी उभारण्याचा विचार असल्याचा अभिप्राय शिष्टमंडळातील प्रतींनिधींनी व्यक्त केला.