भुजबळांची भेट कशासाठी, छत्रपती संभाजीराजे म्हणाले…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 04 एप्रिल 2022 Maharashtra politics  :- खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी सोमवारी नाशिकमध्ये मंत्री आणि ओबीसींचे नेते छगन भुजबळ यांची भेट घेतली. त्यांचे कौतूकही केले. त्यावरून आता राज्यात विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

औरंगाबाद येथील मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी या भेटीवरून नाराजी व्यक्त केली. छात्रपती संभाजीराजे यांनी आज नगरमध्ये याला उत्तर दिले. संभाजीराजे म्हणाले.

‘सर्वांच्या प्रतिक्रियांचे मी उत्तर देऊ शकत नाही. मात्र मला एवढेच माहिती आहे की, मराठा आरक्षणासाठी जेव्हा नाशिकमध्ये मूक आंदोलन झाले होते, तेव्हा भुजबळ तेथे आले होते.

तेव्हा मराठा समाजाला आरक्षण मिळावे, असे ते बोलले होते. बहुजनांना एकत्र करण्याचा विचार शाहू महाराजांनी दिला4  आहे. सहा मे रोजी शाहू महारांजाची स्मृति शताब्दी आहे.

त्यासंबंधी मी मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली. बहुजन समाजाला एकत्र ठेवणे माझे कामच आहे,’ असे संभाजीराजे म्हणाले. संभाजीराजे मंगळवारी नगरमध्ये आले होते.

त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी भुजबळ यांच्या भेटीत काही चुकीचे नसल्याने सांगितले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणातील मुद्द्यांवर बोलण्यास मात्र त्यांनी नकार दिला.