संभाजीराजे शिवसेनेची ऑफर स्वीकारणार? तर निलेश राणे म्हणतात, लाथ मारा त्या..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुंबई : संभाजीराजे (Sambhaji Chhatrapati) यांनी शिवसेनेत (Shivsena) प्रवेश करण्यावरून सध्या वेट अॅन्ड वॉचची भूमिका घेतली आहे. याबाबत आज निर्णय होण्याची शक्यता असून शिवसेनेत येण्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची अट संभाजीराजे मान्य करतील का हे पाहावे लागणार आहे.

संभाजीराजे आणि शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची फोनवरून चर्चा झाल्याच्या बातम्याही आल्या आहेत. तर संभाजीराजे अजूनही अपक्ष लढण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचेही सांगण्यात आले.

त्यानंतर संभाजीराजे यांनी ऑफर (Offer) न स्वीकरल्यास शिवसेनेचा बी प्लॅन तयार असल्याच्या बातम्याही आल्या होत्या. शिवसेना दुसरा उमेदवार देण्यासाठी तयार असल्याचेही सांगण्यात आले. आता शिवेसनेच्या ऑफरनुसार संभाजीराजे उद्या शिवसेनेत दाखल होत हाती शिवबंधन बांधणार का? हा सस्पेन्स आज स्पष्ट होईल.

याबाबत भाजप नेते निलेश राणे यांनी ट्विट केले आहे. या ट्विट मध्ये त्यांनी संभाजीराजे यांना आवाहन केले असून त्यांनी घेतलेल्या भूमिकेवर रात्रभर विचार करा, असे म्हणत भाजप (Bjp) नेते निलेश राणे (Nilesh rane) यांनी संभाजीराजेंना आवाहन करणारे ट्विट केले आहे.

निलेश राणे आपल्या ट्विटमध्ये (Tweet) लिहितात, “कोल्हापूरचे छत्रपती संभाजी, आज रात्रभर विचार करा की ज्या पक्षाने मूक मोर्चा ला मुका मोर्चा म्हणून खिल्ली उडवली, तुमच्याकडे महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे मागितले.

औरंगजेबच्या कबरीला संरक्षण दिले, पक्षात १२ वाजता या सांगून तुमची काय किंमत ठेवली? लाथ मारा त्या खासदारकीला.” असे ट्विट राणे यांनी केले आहे. त्यामुळे आता पुढे काय होणार? हा अंदाज कोणालाही लागत नाही.