लॉकडाऊन होणार कि नाही? आरोग्यमंत्री म्हणाले…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2021 :- राज्यात 2 एप्रिलपासून 50 टक्के लॉकडाऊन लागणार अशा चर्चा होत्या. मात्र लगेचच लॉकडाऊन लागेल असे नाही, मात्र तरीही तशी तयारी सुरू करून ठेवावी लागते असे सूचक विधान आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.

लॉकडाऊन ही प्रक्रिया कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महत्त्वाची असते. 15 दिवस जर कोणी गर्दीच्या ठिकाणी गेलंच नाही, तर संसर्गच होत नाही. त्यातून कोरोनाची साखळी तुटते आणि त्यातून संसर्गाचं प्रमाण कमी होतं.

त्यामुळं लॉकडाऊनचा विचार केला जातो, असंही राजेश टोपे यांनी म्हटलंय. राज्यात लॉकडाऊन लावण्यासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही, मात्र चर्चा त्या दिशेनेच सुरू असल्याचे टोपे यांनी स्पष्ट केले आहे.

सध्या काही दिवस निर्बंध कडक केले जाणार आहेत. मात्र लॉकडाऊन लागणारच नाही असे नाही, परिस्थिती पाहून याबाबचचा निर्णय घेतला जाईल, असं टोपे यांनी म्हंटले आहे.

पुढे बोलताना टोपे म्हणाले कि, राज्यातील नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क घालण्याच्या नियमांचे तंतोतंत पालन केले तर त्यांना कोरोना विषाणूची लागण होणारच नाही.

तशा परिस्थितीत लॉकडाऊनचा प्रश्नच उद्भवत नाही. लॉकडाऊनमुळे अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न उद्भवतो, याची जाणीव सरकारला आहे.

या सर्वाचा विचार करूनच सर्व निर्णय घेतले जातात. त्यामुळंच लॉकडाऊन हा अखेरचा पर्याय ठेवला आहे. पण परिस्थिती नियंत्रणात आली नाही तर ते करावं लागू शकतं, असंही आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|