Alert : तुम्हीही भेसळयुक्त पीठ खात नाही ना? जाणून घेण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या स्टेप्स

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Alert : खाद्यपदार्थांमध्ये भेसळ होणे हे खूप सामान्य झाले आहे. परंतु,या भेसळीचा आपल्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो. तुम्ही आतापर्यंत मिठाई, मावा, मध आणि औषधांमध्ये भेसळ केल्याच्या बातम्या ऐकल्या असतील,पाहिल्या असतील.

त्याचे परिणामही पाहिले असतील. मात्र आता तर आपल्या स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या पिठात मोठ्या प्रमाणात भेसळ केली जात आहे आणि हे भेसळयुक्त पीठ तुमच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक ठरू शकते. ते पीठ भेसळयुक्त आहे की नाही ते तुम्ही सहज ओळखू शकता. त्यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

अनेक भेसळ करणारे पिठात खडूची पावडर मिसळत असल्याचे अनेकवेळा दिसून आले आहे. तुम्हाला हे जाणून घेण्यासाठी टेस्ट ट्यूब घ्यावी लागणार आहे.

त्यात तुम्हाला हायड्रोक्लोरिक ऍसिड मिसळावे लागणार आहे. याच्या मदतीने तुम्ही पिठात मिळणाऱ्या खडूच्या पावडरची माहिती घेऊ शकता. या उपायाचा अवलंब केला तर तुम्हाला तुमचे पीठ खरे आहे की बनावट हे समजेल.

आता तुम्ही एका ग्लास पाण्यात अर्धा चमचा मैदा टाकूनही तुम्ही त्याची सत्यता जाणून घेऊ शकता. असे केल्यावर पिठात काही तरंगताना दिसले की तुमच्या पीठात भेसळ झाली आहे असे समजावे.

पीठ पाहूनही तुम्ही खरे आणि नकली पीठ ओळखू शकता. जर तुमचे पीठ तुम्हाला स्पष्ट दिसत नसेल तर दुकानात विकले जाणारे पीठ बनावट आहे हे समजून घ्या.