Bad Posture : वाकून बसणे आरोग्यासाठी धोकादायक, जाणून घ्या नुकसान !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Side Effects Of Sitting In A Bad Posture : आपल्या सर्वांना माहित आहे की बसताना आपण सरळ बसावे, खांदे रुंद आणि पाठ सरळ असावी. असे बसले नाही तर अनेक प्रकारच्या आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. पण, आपल्यापैकी कोणीही आपल्या बसण्याच्या स्थितीकडे लक्ष देत नाही. हे आश्चर्यकारक आहे की सध्या डेस्क जॉब करणाऱ्यांची संख्या जास्त आहे.

असे असूनही ते त्यांच्या बसण्याकडे लक्ष देत नाहीत. ते नेहमी वाकून बसतात. ते नकळत हे करत असतील, पण यामुळे त्यांना आरोग्याच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. चला तर जाणून घेऊया, वाकून बसल्याने आरोग्याचे कोणते नुकसान होते.

-जेव्हा तुम्ही बराच वेळ वाकून बसता तेव्हा तुमची कंबर वाकते. उभे राहून चालत असतानाही कंबर वाकलेलीच असते. जर तुमची बसताना पाठ सरळ केली नाही तर पाठदुखी, मणक्याचे दुखणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. तसेच पाठीचा कायमचा त्रासही होऊ लागतो.

-तुम्हाला ते कळत नाही, पण जेव्हा तुम्ही बराच वेळ वाकून बसता तेव्हा त्यामुळे मान दुखते. एवढेच नाही तर खांदे समोरच्या दिशेने वाकतात. याशिवाय स्नायूही कमकुवत होऊ लागतात. कधी-कधी मानेत जडपणा आल्याने किंवा छातीत ताण आल्याने डोकेदुखीचा त्रासही सुरू होतो.

-जर तुम्ही डेस्क जॉब करत असाल आणि 8 ते 10 तास वाकून बसत असाल तर तुमच्या पोटावर खूप दबाव निर्माण होतो. म्हणजेच चुकीच्या आसनात बसल्याने शरीराच्या अंतर्गत अवयवांवर दबाव पडू लागतो, त्यामुळे पचनक्रिया प्रभावित होते. जर तुम्हाला या गोष्टी टाळायच्या असतील तर तुम्ही बसताना किंवा चालताना तुमची पाठ सरळ ठेवली पाहिजे.

-वाकून बसल्यामुळे लोकांना उर्जेची कमतरता जाणवते. खरं तर वाकून बसल्यावर पोटावर दाब येतो, खांदे वाकतात आणि कंबरही वाकडी होते. शरीराची ही मुद्रा मनाला सूचित करते की तुम्ही शारीरिकदृष्ट्या ठीक नाही. परिणामी, इच्छा नसतानाही तुम्हाला उर्जेची कमतरता जाणवू लागते.

-खराब आसनामुळे काही स्नायूंवर जास्त ताण पडतो आणि इतरांचा कमी वापर होतो. काही स्नायूंवर शरीराचे वजन वाढू लागते. वजनाच्या असमान वितरणामुळे स्नायू कमकुवत होतात.

-खराब स्थितीत बसल्याने फुफ्फुसांच्या क्षमतेवर परिणाम होऊ लागतो. वाकून बसल्यामुळे श्वासोच्छवासाच्या वेळी फुफ्फुसांचा पूर्ण विस्तार होऊ शकत नाही. परिणामी, श्वास घेण्यासही त्रास होऊ शकतो.

-वाकून बसल्याने रक्ताभिसरणावरही परिणाम होतो. काहीवेळा हात आणि पायांपर्यंत रक्त योग्य प्रकारे पोहोचत नाही, ज्यामुळे हात आणि पाय थंड होऊ शकतात आणि हृदयाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.