Flipkart Big Diwali Sale : iPhone 14 वर बंपर सूट ! केवळ ‘इतक्या’ रुपयांत खरेदीची संधी, पहा ऑफर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

iPhone 14 discount offer : Amazon Great Indian Festival आणि बिग बिलियन डेज सेलमध्ये आयफोन 14 घेण्यापासून तुम्ही हुकले असाल तर आता काळजी करू नका. आयफोन 14 कमी किंमतीत खरेदी करण्याची आणखी एक संधी आली संधी आहे.

आजपासून (2 नोव्हेंबर 2023) फ्लिपकार्ट बिग दिवाळी सेलमध्ये आयफोन 14 वर डिस्काउंट देत आहे. हा सेल 11 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. आयफोन 14 वर उपलब्ध असलेल्या सर्व ऑफर्स आपण येथे जाणून घेऊ –

फ्लिपकार्टवर आयफोनची अनेक मॉडेल्स डिस्काउंटसह उपलब्ध करून देण्यात आली आहेत. पण iPhone 14 या सेल मध्ये 50000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करता येईल. बँक ऑफर्स आणि अतिरिक्त डिस्काउंटसह हा Apple आयफोन 49,999 रुपयांना उपलब्ध होऊ शकतो.

iPhone 14 Discount ऑफर्स

गेल्या वर्षी (2022) मध्ये Apple Far Out इव्हेंटमध्ये iPhone 14 हा 79,900 रुपयांच्या किंमतीत लाँच केला होता. फ्लिपकार्ट सेलमध्ये हे मॉडेल 50,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करता येईल. बिग दिवाळी सेलमध्ये फोनच्या बेस मॉडेलला 54,999 रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आले आहे. एसबीआय क्रेडिट कार्ड आणि फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक कार्डद्वारे फोन खरेदी केल्यास तुम्हाला 4,000 रुपयांची अतिरिक्त सूट मिळेल. याशिवाय जुने फोन एक्सचेंज केल्यास 1,000 रुपयांचा अतिरिक्त बोनस मिळतो. या सर्व ऑफर्ससह हा हँडसेट 49,999 रुपयांमध्ये उपलब्ध होऊ शकतो. याशिवाय फ्लिपकार्टने ग्राहकांना 19,999 रुपयांच्या डाउन पेमेंटसह फोन खरेदी करण्याची संधी दिली आहे. उर्वरित 35,000 रुपये ग्राहक नो-कॉस्ट ईएमआयद्वारे भरू शकतात.

iPhone 14 स्पेसिफिकेशन्स

आयफोन 14 सप्टेंबर 2022 मध्ये लाँच करण्यात आला होता. फोनच्या समोर आणि मागच्या बाजूला ग्लास आहे. तर फ्रेम बनवण्यासाठी अॅल्युमिनियमचा वापर करण्यात आला आहे. हा आयफोन IP68 डस्ट आणि वॉटर रेझिस्टन्स रेटिंगसह येतो.

iPhone 14 मध्ये 6.1 इंचाचा सुपर रेटिना एक्सडीआर ओएलईडी डिस्प्ले आहे. स्क्रीन HDR10 आणि डॉल्बी व्हिजन सपोर्टसह येते. या आयफोनमध्ये Apple A15 बायोनिक चिपसेट आहे. हँडसेटमध्ये स्टोरेजचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी आयफोन 14 मध्ये 12 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हे डिव्हाइस फेस आयडी, यूडब्ल्यूबी तंत्रज्ञान आणि सॅटेलाइट इमर्जन्सी एसओएस सारख्या फीचर्सना सपोर्ट करते. फोनमध्ये फास्ट वायर्ड आणि वायरलेस चार्जिंगसारखे फीचर्स देण्यात आले आहेत.