Business ideas : भारी बिझनेस ! 5 लाखांची मशीन बसवा, दरमहा 1 लाख रुपये कमवा..सबसिडी लोन देखील उपलब्ध

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Business ideas : भारतात सिंगल युज प्लॅस्टिकवर बंदी घालण्यात आली आहे. त्याच्या जागी कागदी पिशव्यांचा वापर सुरू झाला आहे. वर्षभराहून अधिक काळ झाला हा नियम लागू आहे. सिंगल युज प्लॅस्टिक पॉलिथीन पुन्हा कधीच बाजारात येणार नाही.

यामुळे लोक आता कागदी पिशवी वापरू लागले आहेत. त्यामुळे आता तुम्ही जर कागदी पिशवी बनवण्याचा व्यवसाय सुरु केला तर तुम्ही लाखो रुपये कमावू शकता.

कागदी पिशव्या बनवण्याच्या मशिनची किंमत 50000 ते 15 लाख रुपयांपर्यंत आहे. संपूर्ण भारतात या मशिनची मागणी आहे. ही मशीन लावली व व्यवसाय सुरु केला तर सर्व खर्च वजा जाता महिन्याला एक लाख रुपये सहज मिळू शकतात.

तुमचे शिक्षण किती झाले आहे हे या बिझनेस मध्ये महत्वाचे नाही. हे मशिन बसविण्यासाठी शासनाकडून सवलतीत कर्ज देखील मिळते. कर्जासाठी कोणत्याही प्रकारची गॅरंटी लागत नाही. कालानुरूप बदलण्यासाठी जर लवकर याचा लाभ घेतला तर नक्कीच तुम्ही लाखो रुपये कमवाल.

या व्यवसायात महिलांसाठी विशेष संधी नसली तरी कोणत्याही सरकारी योजनेअंतर्गत अनुदान आणि कर्जासाठी महिलांना प्राधान्य देण्याची तरतूद आहे. याचा फायदा महिला घेऊ शकतात. महिलांना स्वावलंबी होण्यासाठी सरकार प्रोत्साहन देत आहे.

याचा फायदा तुम्ही घेऊ शकता. तुम्ही या व्यवसायात उतरलात तर तुम्ही खासगी बाजारच नव्हे तर सरकारी पुरवठ्याचे कामही तुम्ही करू शकता.

कागदी पिशव्या बनवण्याच्या व्यवसायात 20 ते 30 टक्के निव्वळ नफा होतो. भारतातील काही व्यापारी 50 टक्क्यांपर्यंत निव्वळ नफा कमावत आहेत. यातील नफा आपण कुठे आणि किती कच्चा माल खरेदी करत आहात आणि

आपण उत्पादित माल कोणत्या प्रकारच्या बाजारपेठेत पुरवत आहात यावर अवलंबून असेल. एखाद्या उत्पादनावर निव्वळ नफा कमी असला तरी त्याची डिमांड व विक्री जास्त असली तर तो उत्तम व्यवसाय असतो असे उद्योजक मानतात. त्यामुळे तुम्ही हा बिझनेस करून उत्तम नफा कमावू शकता.