तुमचं Twitter Account किती सुरक्षित आहे ? जाणून घ्या हॅकिंग कसे रोखता येईल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2021 :-  ट्विटर अकाऊंट हॅक होणे हे नेहमीचेच झाले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विट अकाऊंटही सुरक्षित राहिलेले नाही.

बीटकॉईन ला कायदेशीर करावे, असे ट्विट त्यांच्या अकाऊंटवरुन करण्यात आले मोठ्या मान्यवर व्यक्तीचे ट्विटर अकाऊंट हॅक होणे, हे काही पहिल्यांदाच घडलेले नाही.

याहीपूर्वी सप्टेंबर २०२० मध्ये पंतप्रधान मोदी, जुलैत जो बायडेन, बराक ओबामा, बिल गेट्स, एलन मस्क यांचे ट्विटर अकाऊंट हॅक झाले होते. यातून सोशल मीडिया सुरक्षित नाही, हेच सिद्ध होते.

हॅकर्स कशा प्रकारे अकाऊंट हॅक करतात सर्व हॅकर्स सोशल मीडिया अकाऊंट हॅक करण्यासाठी एक सारखीच पद्धती वारताना दिसतात, असे सायबर तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

सोशल मीडिया युजर्सच्या दोन चुकांचा ते बरोबर फायदा उचलतात. फेसबुक, इन्स्टा, लिंक्डइन यासारख्या सोशल मीडियाच्या एप्लिकेशनमधील लूपहोलकडे हॅकर्सचे लक्ष असते.

त्याचाच फायदा उचलत ते अकाऊंट हॅक करतात. सोशल मीडिया कंपन्यांकडे तांत्रिकांची टीम असते, पण तरीही हॅकर्स अकाऊंट हॅक करण्यात यशस्वी होतात.

यात हॅकर्स काही व्यक्तींचे आयडी हॅक करतात. हॅकर्स फोन किंवा मेसेज पाठवून, तुमच्यासोबक फिशिंग लिंक शेअर करतात. या लिंकवर क्लिक केल्यास सोशल मीडियाच्या साईट्सवर जाण्यासाठी लॉग इन करण्याचे सांगण्यात येते.

त्यांच्या या जाळ्यात अडकून जर तुम्ही आय़डी आणि पासवर्ड टाकलात तर हॅकर्सच्या ताब्यात तुमचा आयडी आणि पासवर्ड जातो. त्यामुळे अकाऊंट हॅक करणे सोपे जाते.

प्रायव्हसी सेटिंगसाठी अनेक वेळा हॅकर्सकडून ओटीपीचीही विचारणा होते. ज्या पोस्ट तुम्ही केलेल्याच नाहीत, त्या तुमच्या अकाऊंटवर दिसणे, लॉगइन करण्यात अडचणी येणे किंवा लॉग इन करताच न येणे,

माहितीशिवाय कुणालातरी मेसेज गेल्याचे लक्षात येणे, नव्या गेमचे आणि एपचे नोटिफिकेशन येणे, अशा पद्धतीने तुमचे अकाऊंट हॅक झाले आहे, हे तुमच्या लक्षात येऊ शकते.

हॅकिंग कसे रोखता येईल हॅकिंगपासून वाचण्यासाठी सावध राहणे अत्यंत गरजेचे आहे. कुणालाही आपल्या सोशल मीडिया अकाऊंटचा आयडी आणि पासवर्ड शेअर करु नये.

कुणी अनोळखी व्यक्ती फोनवर आपल्याकडून ओटीपी मागत असेल तर तो दऊ नये. फिशिंग लिंककडे लक्ष ठेवायला हवे.

ज्या लिंक ऑथेंटिक आहेत, त्यावरच क्लिक करणे. सोशल मीडिया कंपन्यांनीही एप्लिकेशनची नियमित सुरक्षितता चाचणी आणि तपासणी करणे गरजेचे आहे.