Advantages of Exotic Fruits : आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत ‘ही’ विदेशी फळे, जाणून घ्या फायदे !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Advantages of Exotic Fruits : लहानपणापासून आपण हे ऐकत आलो आहे की दररोज फळांचे सेवन करणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायद्याचे आहे. ते केवळ पोषक तत्वांनी समृद्ध नसून, आरोग्याच्या अनेक समस्या सोडवू शकतात. हवामानातील फरकामुळे सर्व देशांमध्ये सर्व प्रकारची फळे पिकवणे शक्य होत नाही. त्यामुळे अनेक फळे बाहेरच्या देशातून आयात केली जातात. आयातीमुळे त्यांची किंमत इतर फळांपेक्षा जास्त असते. या फळांची किंमत जरी जास्त असली तरी अनेक समस्यांवर ते रामबाण उपायही ठरू शकतात. आज आपण अशाच काही विदेशी फळांबद्दल जाणून घेणार आहोत, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात.

अ‍ॅव्होकॅडो

Avocado
Avocado

अ‍ॅव्होकॅडोचा उगम दक्षिण-मध्य मेक्सिकोतून झाल्याचे मानले जाते. एवोकॅडो हा बेरीचा एक प्रकार आहे, ज्याला बटर फ्रूट असेही म्हणतात. हेल्दी फॅट्ससोबतच यामध्ये व्हिटॅमिन-बी6, व्हिटॅमिन-ई, व्हिटॅमिन-सी, मॅग्नेशियम आणि फोलेट यांसारखे पोषक घटक आढळतात. यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते, जे निरोगी पचन राखण्यास मदत करते. हे फळ हृदयाच्या आरोग्यासाठी आणि डोळ्यांसाठी खूप फायदेशीर मानले जाते.

ड्रॅगन फ्रुट

Dragon Fruit
Dragon Fruit

आहारातील फायबरसोबतच ड्रॅगन फ्रूटमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजेही मोठ्या प्रमाणात असतात. हे फळ जेवढे आकर्षक दिसते तेवढेच ते आरोग्यासाठीही फायदेशीर मानले वाजते. यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने ते पचनासाठी फायदेशीर सोपे आहे. याशिवाय यामध्ये अँटीऑक्सिडंट्सही मुबलक प्रमाणात आढळतात, त्यामुळे ते त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर मानले जाते.

ग्रेपफ्रूट

Grapefruit
Grapefruit

संत्रा आणि लिंबासारखे दिसणारे हे फळ ग्रेपफ्रूट म्हणूनही ओळखले जाते. यामध्ये सायट्रिक ऍसिडचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे ते अनेक आरोग्य समस्यांवर रामबाण उपाय ठरते. कॅलरी कमी असण्यासोबतच त्यात जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्सही जास्त प्रमाणात असतात. हे रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यास, मधुमेह नियंत्रित करण्यास मदत करते.

किवी

Kiwi fruit
Kiwi fruit

किवीचा उगम दक्षिण चीनच्या पर्वतातून झाला असे मानले जाते. या फळामध्ये आवश्यक खनिजांसोबतच ल्युटीन देखील मुबलक प्रमाणात आढळते. पचनसंस्था सुरळीत ठेवण्यासोबतच रोगप्रतिकारशक्ती राखण्यासाठीही हे फायदेशीर मानले जाते. याशिवाय मधुमेह, हृदयविकार आणि डोळ्यांसाठीही हे गुणकारी मानले गेले आहे.

स्टार फ्रुट

Star Fruit
Star Fruit

स्टार फ्रुट हे हलके हिरवे रंगीबेरंगी फळ असून त्याची चव अत्यंत आंबट असते. यामध्ये इतर पोषक तत्वांसह भरपूर फायबर असते, जे योग्य पचन आणि इन्सुलिन संतुलन राखण्यास मदत करते. रक्तदाब, कोलेस्टेरॉल आणि हृदयविकारासाठी हे फायदेशीर मानले जाते.

मँगोस्टीन

Mangosteen
Mangosteen

मँगोस्टीन हे थायलंडचे राष्ट्रीय फळ आहे, ज्याला मंगुस्तान असेही म्हणतात. या फळाची चव गोड आणि आंबट असते. यामध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्त्वे आढळतात, त्यामुळे ते त्वचेसाठी फायदेशीर मानले जाते. वजन कमी करण्यासाठी आणि पचनक्रिया व्यवस्थित ठेवण्यासाठीही या फळाचे सेवन केले जाते.