Tulsi Vivah 2023 : तुळशी विवाहाच्या दिवशी करा ‘हे’ उपाय, वैवाहिक जीवनातील सर्व अडचणी होतील दूर !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Tulsi Vivah 2023 : दिवाळीच्या शेवटी जरवर्षी तुळशी विवाह साजरा केला जातो. तुळशी विवाह झाल्यानंतर सर्वत्र लग्नाचे वारे वाहू लागतात. या वर्षी तुळशी विवाह 24 नोव्हेंबर रोजी साजरा केला जाणार आहे. 24 ते 27 नोव्हेंबरदरम्यान तुळशी विवाह होणार असून, यानंतर जून महिन्याच्या शेवटपर्यंत लग्नाचा मौसम राहणार आहे.

तुळशी विवाह हा दरवर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीला साजरा केला जातो जो या वर्षी 24 नोव्हेंबर रोजी साजरा केला जाणार आहे. तुळशी विवाहाच्या या दिवशी रोपाची स्थापना भगवान विष्णूची पत्नी तुळशी म्हणून केली जाते आणि त्यांचा विवाह सोहळा पार पाडला जातो. हिंदू धर्मात हा सण खूप महत्त्वाचा मानला जातो. या दिवसानंतर सर्व शुभ कार्यांना सुरुवात होते. डदरम्यान, आज आम्ही तुम्हाला अशा काही उपायांबद्दल सांगणार आहोत, जे तुम्ही या दिवशी केले तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात चांगले परिणाम जाणवतील.

या दिवशी मनोभावे पूजा केल्याने वैवाहिक जीवन आणि प्रेमसंबंधातील सर्व अडचणी दूर होतात. आजच्या या लेखात आपण त्याबद्दलच जाणून घेणार आहोत.

तुळशी विवाहाच्या दिवशी करा ‘हे’ उपाय !

-या दिवशी पूजा केल्याने तुमच्या प्रेम आणि वैवाहिक जीवनात स्थिरता येईल. या दिवशी मंगलाष्टकांचे पठण करावे, ज्यामुळे तुळशीमाता आणि भगवान विष्णूच्या पूजेने नात्यात सौहार्द, वाढू शकते. तसेच, सकारात्मक विचार ठेवा आणि जोडीदारासोबत या मार्गावर चालत राहा, जेणेकरून जीवनात नेहमी आनंद राहील.

-तुलसी विवाहाच्या दिवशी माता तुळशी आणि भगवान शालिग्राम यांचा विवाह विधी करणे धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे. हे पारंपारिकपणे नशीब आणि मुलाच्या जन्मासाठी केले जाते.

-या दिवशी देवी तुळशीला श्रृंगाराच्या सोळा वस्तू अर्पण करा. त्यानंतर विधीनुसार त्यांची पूजा करावी. या प्रकारचा विधी भक्तीभावाने करावा.

-तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशी मातेसमोर तुपाचा दिवा लावावा. त्यानंतर गंगाजलाने तुळशीची पाने शिंपडा. यामुळे जीवनात सुख, समृद्धी आणि शांती नांदेल.

तुळशी विवाह पूजा पद्धत :-

-सर्व प्रथम स्नान करावे.
-त्यानंतर एक पवित्र स्थान तयार करा, जिथे तुम्ही तुळशी विवाहासाठी पूजा करू शकता.
-तुळशी विवाहासाठी भगवान विष्णूच्या मूर्तीसोबत तुळशी मातेची मूर्ती स्थापित करा.
-विष्णू आणि तुळशीमातेच्या मंत्रांचा जप करा.
-फुले, धूप, दिवा, नैवेद्य अर्पण करा.
-तुलसी विवाहाची कथा ऐका किंवा वाचा.
-त्यानंतर अन्न, फळे आणि प्रसाद वाटप करा.