Weight Gain : झटपट वजन वाढणे असू शकते ‘या’ घातक आजारांचे लक्षण, वेळीच करा उपाय; नाहीतर…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Weight Gain : सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत अनेकजण आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाहीत. व्यायाम करण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे त्यांचे वजन वाढत जाते. वजन वाढले की त्याचा त्यांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो.

ज्याप्रमाणे सतत वजन कमी होणे हे काही आजाराचे लक्षण असते त्याचप्रमाणे अचानक वाढलेले वजन वाढणं हे देखील काही घातक आजाराचे लक्षण असण्याची शक्यता असते. अनेकांना याबद्दलची माहिती नसते. त्यामुळे त्याचा त्यांना त्रास सहन करावा लागतो.

उच्च रक्तदाब

वजन जास्त असणाऱ्या लोकांना उच्च रक्तदाबाची समस्या मोठ्या प्रमाणात असते. ज्यामध्ये रक्तवाहिन्यांमधून रक्त सामान्यपेक्षा वेगाने वाहत असते. असे झाले तर त्या व्यक्तीच्या हृदयावर खूप ताण येतो. त्यामुळे रक्तवाहिन्यांचे नुकसान होते. परिणामी हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक, मूत्रपिंडाचा आजार आणि मृत्यूचा धोका वाढत जातो.

थायरॉईड

तज्ज्ञांच्या मतानुसार, समजा तुम्हाला थायरॉइडची समस्या असल्यास शरीरात सर्वात अगोदर दिसणारी गोष्ट म्हणजे तुमचे वाढते वजन. ही समस्या त्यावेळी निर्माण होते ज्यावेळी तुमच्या थायरॉईड ग्रंथी खूप कमी प्रमाणात हार्मोन्स तयार करतात. समजा थायरॉईड शरीरात मोठ्या प्रमाणावर हार्मोन्स बनवत असल्यास वजन खूप कमी होते. याला चहायपरथायरॉईडीझम असेही म्हटले जाते. विशेष म्हणजे हा आजार कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला होतो.

हृदयरोग

वजन जास्त असेल तर हृदयविकाराचा धोका वाढत जातो. असे झाले तर हृदयविकाराचा झटका, हार्ट फेल्युअर किंवा हृदयाची असामान्य लय यांसारख्या समस्या निर्माण होतात. उच्च रक्तदाब, रक्तातील चरबीची असामान्य पातळी आणि उच्च रक्तातील साखर यामुळे हृदयविकाराचा धोका वाढण्याची शक्यता असते.

ऑस्टियोआर्थराइटिस

ऑस्टियोआर्थरायटिस ही एक अतिशय सामान्य आणि दीर्घकाळ टिकणारा आजार आहे. त्यामुळे सांध्यांमध्ये वेदना आणि सूज येते.

मधुमेह

समजा शरीरात रक्तातील ग्लुकोज किंवा रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त झाले तर टाइप २ मधुमेह होतो. टाइप 2 मधुमेह असणाऱ्या 10 पैकी 8 लोक जास्त वजन किंवा लठ्ठ आहेत. उच्च रक्तातील साखरेमुळे हृदयविकार, पक्षाघात, मूत्रपिंडाचे आजार, डोळ्यांच्या समस्या आणि इतर समस्या निर्माण शकतात. हा आजार कमी करण्यासाठी, आपल्या एकूण शरीराच्या वजनाच्या 5 ते 7 टक्के कमी करण्याची आणि दररोज व्यायाम करण्याचा सल्ला दिला जातो.

लक्षात ठेवा या गोष्टी

हे लक्षात घ्या की अचानक वजन वाढण्याची अनेक कारणे असतात. त्यामुळे आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. सतत आपल्या शरीराची तपासणी करावी. तसेच शरीरामध्ये कोणताही मोठा आजार असेल तर त्या आजारावर वेळीच उपचार करावे.