त्या बारापैकी एक वैद्यकिय महाविद्यालय अहमदनगरलाही मिळणार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra News: राज्य सरकारने नुकतीच विधिमंडळात १२ शासकीय वैद्यकिय महाविद्यालये नव्याने स्थापन करण्याची घोषणा केली आहे. त्यातील एक अहमदनगरला द्यावे, अशी मागणी भाजपच्या नगर जिल्ह्यातील शिष्टमंडळाने केली आहे.

त्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व वैद्यकिय शिक्षण मंत्री ना गिरीशजी महाजन यांची अहमदनगर जिल्हा भाजपा पदाधिकारी यांचे शिष्टमंडळाने भेट घेतली.

या शिष्टमंडळात प्रदेश कार्यकारण सदस्य तथा माजी जिल्हाध्यक्ष प्रा भानुदास बेरड, मा वसंत लोढा, माजी नगराध्यक्ष ॲड अभय आगरकर, मा सचिन पारखी, मा किशोर बोरा, माजी जिल्हा परिषद सदस्य विश्वनाथ कोरडे, मा सुभाष दुधाडे सहभागी होते.

अहमदनगर हे मराठवाडा व विदर्भाचे प्रवेशद्वार मानले जाते, तसेच भौगोलिक व विस्ताराच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे, व पन्नास लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा आहे.

मात्र असे असताना स्वातंत्र्याच्या ७५ वर्षीच्या काळात अद्याप पर्यंत शासकीय वैद्यकिय महाविद्यालय स्थापन होऊ शकले नाही,

हे महाविद्यालय नसल्याने जिल्ह्यातील नागरीकांना दुर्धर आजारांच्या मग अपघात असेल साथीचे आजार, अशा वेळी पुणे, मुंबई येथे ऊपचारांसाठी जावे लागते,

त्यांच बरोबर बीड, धाराशीव अशा मराठवाड्यातील जिल्ह्यातीलही रुग्नांना ही नगर येथे वैद्यकिय महाविद्यालय झाल्यास सोईचे असेल,

असे शिष्टमंडळाने सांगितले. शिष्टमंडळाची भूमिका समजावून घेत अहमदनगर येथे शासकीय वैद्यकिय महाविद्यालय मंजूर करण्याचे आश्वासन फडणवीस व वैद्यकिय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिले.