Crop Loan Decision: पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय! ‘या’ जिल्ह्यातील तालुक्यांना होईल फायदा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Crop Loan Decision:- राज्यामध्ये यावर्षी खूप कमी प्रमाणावर पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी दुष्काळाची तर काही ठिकाणी दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. शेतकऱ्यांचा खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेलेला आहेच. परंतु रब्बी हंगामात देखील पिकांच्या उत्पादनाचे कुठल्याही प्रकारची शाश्वती नाही.

अशा परिस्थितीमध्ये आता ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतलेले आहे अशा शेतकऱ्यांसाठी सरकारने एक मोठा दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला असून राज्यातील 40 तालुक्यांमध्ये घोषित करण्यात आलेली दुष्काळ आणि दुष्काळ सदृश्य परिस्थिती मुळे पीक कर्ज वसुलीला सरकारने स्थगिती दिलेली आहे.

तसेच इतर 1021 महसूल मंडळांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित करण्यात आलेली असून त्यांना काही सवलती मंजूर करण्यात आलेले आहेत. नेमकी कुठल्या निर्णयांना सरकारने स्थगिती दिलेली आहे व याचा फायदा कुठल्या जिल्ह्यातील तालुक्यांना मिळणार आहे? याबाबतचे महत्त्वपूर्ण माहिती या लेखात घेऊ.

दुष्काळ दुष्काळ सदृश्य परिस्थिती असलेल्या ठिकाणी या निर्णयांना देण्यात आली स्थगिती

जमीन महसुलामध्ये सूट तसे सहकारी कर्जाचे पुनर्गठण, शेतीशी संबंधित असलेल्या कर्जाच्या वसुलीला स्थगिती, कृषी पंपाचे जे काही चालू विज बिल असेल त्यामध्ये 33.5% ची सूट, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कामध्ये माफी, रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून कामाच्या निकषांमध्ये शिथीलता,

पाणीटंचाईच्या ठिकाणी पाण्याच्या टँकरची आवश्यकता असेल त्या ठिकाणी टँकर चा वापर, ज्या ठिकाणी पाण्याची टंचाई जाहीर करण्यात आलेली आहे अशा गावातील शेतकऱ्यांच्या शेती पंपाची वीज जोडणी खंडित न करणे इत्यादी नियमांना आता स्थगिती देण्यात आलेली आहे.

 या जिल्ह्यांमध्ये देण्यात आली स्थगिती

1- धुळे जिल्हा धुळे जिल्ह्यात शिंदखेडा तालुका

2- जळगाव जिल्हा जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव तालुका

3- नंदुरबार जिल्हा नंदुरबार तालुका

4- जालना जिल्हा जालना जिल्ह्यात भोकरदन, बदनापूर, जालना, मंठा आणि अंबड तालुका

5- बुलढाणा जिल्हा बुलढाणा जिल्ह्यात बुलढाणा आणि लोणार तालुका

6- नाशिक जिल्हा नाशिक जिल्ह्यात मालेगाव, येवला आणि सिन्नर तालुका

7- छत्रपती संभाजी नगर छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात सोयगाव आणि छत्रपती संभाजी नगर तालुका

8- पुणे जिल्हा पुणे जिल्ह्यात पुरंदर सासवड, बारामती, शिरूर घोडनदी, दौंड आणि इंदापूर तालुका

9- लातूर जिल्हा लातूर जिल्ह्यामध्ये रेनापुर तालुका

10- सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्ह्यात बार्शी, माळशिरस आणि सांगोला तालुका

11- धाराशिव जिल्हा धाराशिव जिल्ह्यात वाशी, लोहारा आणि धाराशिव तालुका

12- सातारा जिल्हा सातारा जिल्ह्यात वाई आणि खंडाळा तालुका

13- सांगली जिल्हा सांगली जिल्ह्यात खानापूर विटा, मिरज,  कडेगाव आणि शिराळा तालुका

14- कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर जिल्ह्यात हातकणंगले आणि गडहिंग्लज तालुका

15- बीड जिल्हा बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई, धारूर आणि वडवणी तालुका