Election Result 2022 : उत्तर प्रदेशमध्ये भाजपची मुसंडी, तर सपाचे शतक पूर्ण

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

लखनौ : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी मतमोजणीला (Assembly Election result counting starts) सुरुवात झाली आहे. पोस्टल बॅलट मतमोजणीला सुरुवात (Counting begins) झाली असून आता कल हाती येत आहेत.

सद्य स्थितीला उत्तर प्रदेश निवडणुकीच्या निकालाचे (UP Assembly Election Result 2022) कल हाती आले असून, सध्या तरी भाजपने मुसंडी मारल्याचे दिसून येत आहे.

भाजप पक्षाने तब्बल दोनशे पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर आहे. तर समाजवादी पक्षाने (SP) आतापर्यंत शतकी खेळी केल्याचे समोर येतेय. उत्तर प्रदेशमध्ये भाजपने (BJP) योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या नेतृत्त्वात निवडणूक लढवली.

तर दुसरीकडे सध्या आलेल्या कलानुसार बहुजन समाजवादी पक्ष, काँग्रेसला (Congress) अजूनही दुहेरी आकडाही गाठता आला नाही. मात्र दुपारपर्यंत हे चित्र स्पष्ट होईल. मात्र चालू घडीला भाजप तब्बल १०० जागांनी आघाडीवर आहे.

भाजपसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी देखील प्रचारात उपस्थिती लावली. दुसरीकडे उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्या नेतृत्त्वात समाजवादी पक्ष (SP) आणि आरएलडीने निवडणूक लढवली आहे.

दरम्यान, अखिलेश यादव यांनी आज सकाळी ८ वाजून ४१ मिनिटांनी ट्वीट केले आहे. त्यात ते म्हटले आहे, इम्तिहान बाकी है अभी हौसलों का, वक़्त आ गया है अब ‘फ़ैसलों’ का. यानंतर त्यांनी आपले कार्यकर्ते, समर्थक, नेते, पदाधिकारी, शुभेच्छुक यांना मनापासून धन्यवाद दिले आहे.