या शहरात हेल्मटधारी ठरतायत लकी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 04 एप्रिल 2022 Maharashtra news  :- मधल्या काळात मागे पडलेली हेल्मेटसक्ती काही शहरांत पुन्हा लागू करण्यात आल्याने त्याला विरोधही सुरू झाला आहे. आता अनेक ठिकाणी थेट दंड करण्यासोबत प्रबोधन आणि मतपरिवर्तन करण्यावर पोलिस भर देत आहेत.

औरंगाबाद शहरात पोलिसांनी आसाच एक आगळावेगळा उपक्रम हाती घेतला आहे. हेल्मेट न घालणाऱ्यांना नव्हे तर हेल्मट घालणाऱ्यांना पोलिस आयुक्त कार्यालयात बोलावून त्यांना भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात येत आहे.

शहरातील प्रत्येक सिग्नलवर हेल्मेट घालून जाणाऱ्यांनांना वाहतूक पोलिस थांबवत आहेत. त्यांचे फोटो काढले जात आहेत. दिवसभरात अशा ३०० ते ३५० हेल्मेटधारी वाहनचालकांचे फोटो काढले जात आहेत.

त्यानंतर त्यातील दहा जणांची निवड केली जाते. त्यांना पोलिस आयुक्त कार्यालयात बोलावून सत्कार केला जातो, भेटवस्तू दिली जाते.

पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांच्या संकल्पेतून सुरू झालेल्या या उपक्रमामुळे हेल्मेटधारींची संख्या वाढत असल्याचे दिसून येते.