Maharashtra News : महाराष्ट्राचे भरतपूर अर्थात मध्यमेश्वर पक्षी अभयारण्य धोक्यात? हजारो विदेशी पक्षांचाही अधिवास होईल नष्ट? नांदूर मध्यमेश्वरच्या दरवाजामुळे मोठं संकट

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra News : महाराष्ट्राला नैसर्गिक वैविध्याने एक वेगळेच सौंदर्य प्राप्त झाले आहे. विविध बंधारे, धरणे, अभयारण्ये यामुळे जैविविधता पुष्कळ आहे. हजारो पक्षांचे स्थान असणारे व नैसर्गिक सौंदर्य वाढवणारे नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्य.

ज्येष्ठ पक्षीतज्ञ डॉ. सलीम अली यांनी सन १९८० मध्ये नांदूर मध्यमेश्वरला भेट दिली आणि ‘हे तर महाराष्ट्राचे भरतपूर आहे’ असे उद्‌गार त्यांनी त्यावेळी काढलेले होते. यावरूनच त्याचे सौंदर्य किती आहे ते समजते.

परंतु आता शासनाच्या एका धोरणामुळे आता या अभयारण्याचे अस्तित्वच संपुष्टात येईल की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.

नेमके काय आहे कारण?

नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यावर नवीन दरवाजा बसवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे आता पक्षी अभयारण्याचे अस्तित्वच संपुष्टात येईल अशिशक्यता वारवण्यात येतीये. रामसर मान्यता असलेले हे एकमेव धरण असून परदेशी पक्ष्यांची वर्दळही मंदवणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

काय आहे अभयारण्याचा इतिहास ?

सन १९०८ च्या दरम्यान ब्रिटिश सरकारने गोदावरी कालव्यात पाणी वळवण्यासाठी हा उन्नयी नांदूर मध्यमेश्वर बंधारा बांधला. पाणी फुगवट्यात गेलेली २१६ हेक्टर जमीन ब्रिटिश सरकारने संपादित केली. शंभर वर्षांत या बंधाऱ्याच्या मागील बाजूला पाणथळ व दलदलीचे क्षेत्र तयार झाले.

अभयारण्याचे क्षेत्र सुमारे १००.१२ चौरस किलोमीटर आहे. त्यात गाळ व दलदलीमुळे नदीपात्रात उथळ खोलगट भाग, उंचवटे, अशी उंचसखल भूरूपे तयार झाली. पक्ष्यांना खाद्य महणून आवश्यक असलेले मासे, शैवाल, येथे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असल्यामुळे येथे पक्ष्यांची संख्या वाढत गेली. पक्ष्यांच्या स्थलांतराच्या काळात येथे सुमारे ३५ हजार पक्षी आढळत असल्याची नोंद आहे.

हा परिसर १९८६ मध्ये नांदूर मध्यमेश्वर अभयारण्य म्हणून अधिसूचित करण्यात आला. सन २०२० मध्ये या ठिकाणाला जागतिक ‘रामसर’ स्थळ म्हणून मान्यता मिळाली. रामसर स्थळांच्या यादीत समाविष्ट होणारे हे महाराष्ट्रातील पहिले ठिकाण आहे.

इराणमधील रामसर या शहरात १९७१ मध्ये जगभरातील जागांच्या संरक्षणासाठी विचारमंथन करण्यासाठी एक परिषद झाली. परिषदेत भारतासह ९० देशांनी पाणथळ संवर्धनाचा ठराव मंजूर केला. सन १९७५ पासून ठराव अंमलात असून

ज्या पाणथळ जागेवर २० हजार पेक्षा जास्त पक्षी आढळतात, अशा ठिकाणांना ‘रामसर’चा दर्जा प्राप्त होतो. या अभयारण्यात वनस्पतींच्या ५२६ जाती/प्रजाती, २०६ प्रजातीचे पक्षी, गोड्या पाण्यातील २४ माश्यांच्या प्रजाती, ४९ फुलपाखरांच्या प्रजाती आढळतात.

येथे विदेशातूनही येतात पक्षी

फ्लेमिंगो – ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, कच्छचे आखात, सामान्य क्रौंच – सायबेरिया व मध्य आशिया, करकरा क्रौंच – मंगोलिया व मध्य आशिया, युरेशियन कोरल – मध्य युरोप व पश्चिम आशिया, तलवार बदक-रशिया व मध्य आशिया, बाकचोच तुतारी – उत्तर आशिया, चिखली तुतारी – युरोप, थापट्या बदक- युरोप व आशिया

राज्य व केंद्र सरकारने लक्ष घालण्याची मागणी

दरवाजे हा जलसंपदा विभागाशी निगडीत विषय नाही, तर तो अभयारण्यातील जैविक साखळी व दुर्मिळ प्रजातीच्या अस्तित्वाचा विषय आहे. ‘रामसर’ करारात केंद्र सरकारने जे धोरण घेतले त्याच्या विसंगत भूमिका राज्य सरकार घेत असल्याची टीका सध्या होत आहे.

राज्य व केंद्र सरकारने लक्ष घालून दरवाजे बसवण्यास प्रतिबंध करावा. यापूर्वी बसविलेले ८ दरवाजे बंद करावे. त्याचप्रमाणे केंद्र सरकारने या प्रकरणाची चौकशी करावी व नांदूर मध्यमेश्वर अभयारण्याला अभय द्यावे अशी मागणी सध्या होत आहे.