Nashik : मोठी बातमी! बाळूमामांच्या मेंढ्यांचा कळप चिरडला, 15 मेंढ्यांचा मृत्यू…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Nashik : नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे  पंचाळे गावच्या शिवारात शहा पंचाळे रस्त्याने बाळू मामाची मेंढयांचा कळप स्विफ्ट कारने उडवल्याची घटना घडली आहे. 12 ते 15 मेंढयांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. बाळू मामांच्या तेरा नंबरच्या पालखीचा मुक्कामही सध्या याच भागात होता. त्याच दरम्यान दुर्दैवी घटना घडली आहे.

यामध्ये काही मेंढया गंभीर जखमी झाल्या आहेत. शेतात सायंकाळच्या वेळी जात असतांना हा अपघात घडला आहे. शहा बाजूकडून पंचाळेच्या बाजूला जात असतांना हा अपघात झाला आहे. काही मेंढयांचा जागेवर मृत्यू झाला आहे.

तसेच आणखी काही मेंढया जखमी असल्याने त्यांच्यावर पैशू वैद्यकीय दवाखान्याच्या माध्यमातून उपचार सुरू आहे. हा अपघात खूपच भीषण होता. दरम्यान, सिन्नर परीसरात वारंवार अपघात होत असल्याने कारवाईची मागणी केली जात आहे.

या घटनांमुळे गावकऱ्यांच्यामध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या गावातील पोलिस पाटील शांताराम कोकाटे यांच्यासह पोलीस हवालदार यांनी यावेळी मदत केली असून गावकऱ्यांनी धरणे आंदोलन देखील केले आहे, मात्र परिस्थिती आहे तशीच आहे.

काही दिवसांपूर्वी याच परिसरात एका खाजगी बस आणि ट्रकचा अपघात झाला होता. यामध्ये चार ते पाच जणांचा मृत्यू झाला होता तर दुसरीकडे अनेकजण जखमी झाले होते. यामुळे याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.