मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! आज ‘या’ कालावधीत एक्सप्रेसवे वाहतुकीसाठी बंद, वाचा पर्यायी वाहतूक मार्ग

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

   सध्या महाराष्ट्रामध्ये पावसाने धुमाकूळ घातला असून संपूर्ण राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्यामुळे वाहतुकीला देखील खोळंबा निर्माण झालेला आहे. अनेक घाट मार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून प्रशासनाच्या माध्यमातून दरडी हटवण्याकरिता प्रयत्न केले जात आहेत.

अगदी याच पद्धतीने जर आपण मुंबई-पुणे एक्सप्रेसवेचा विचार केला तर यावर देखील रात्री दरड कोसळल्यामुळे पुण्यावरून मुंबईकडे जाणारी वाहतूक काही तास ठप्प झाली होती. ही दरड हटवण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत असून आज हा एक्सप्रेसवे काही कालावधी करिता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. यासंबंधीचेच अपडेट आपण पाहणार आहोत.

 आज दुपारी मुंबईपुणे एक्सप्रेस वे वाहतुकीकरिता बंद

यासंबंधीचे सविस्तर वृत्त असे की, मुंबई ते पुणे या द्रुतगती महामार्गावर  आज दुपारी दरड हटवले जाणार असून याकरिता दोन तासाचा ब्लॉक घेण्यात येणार असल्यामुळे दुपारी बारा ते दोन या कालावधीत या ठिकाणची वाहतूक संपूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. पुणे शहराहून मुंबईला जाणारी जी काही वाहतूक आहे ती आज दोन तासांसाठी बंद ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय प्रशासनाने घेतला असल्यामुळे  याकरिता पर्यायी वाहतूक मार्ग उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

जर आपण गेल्या दोन दिवसाचा विचार केला तर लोणावळा या परिसरामध्ये मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे रविवारी खंडाळा घाटात दरड कोसळली व अनेक छोट्या मोठ्या दरड कोसळण्याच्या घटना देखील घडल्या आहेत. या दरडी हटवण्याच्या कामाकरिता प्रशासनाने या ठिकाणची वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. रविवारी या महामार्गावर दोन ठिकाणी दरळी कोसळण्याच्या घटना घडल्या होत्या. या दरडी मुंबईकडे जाणाऱ्या महामार्गावर कोसळल्या होत्या. त्यामुळे मध्यरात्रीपासूनच ठिकाणची वाहतूक संथ गतीने सुरू होती.

या ठिकाणी एक दरड लोणावळ्याजवळ तर दुसरी अडोशी बोगद्याजवळ कोसळली आहे. परंतु या ठिकाणची दरड हटवण्यात आलेली आहे. परंतु या एक्सप्रेस वे वरील एक लेन अजून देखील बंद आहे. या ठिकाणी भरपूर प्रमाणात चिखल आणि दगड गोटे पडल्यामुळे वाहने घसरण्याची भीती आहे. त्यामुळे काही दुर्घटना घडू नये याकरिता ही लेन बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या कारणामुळे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दोन तासांकरिता मुंबईकडे जाणारी वाहतूक थांबवण्याचा निर्णय घेतलेला आहे.

 या मार्गाने वळवण्यात येईल वाहतूक

पुण्याहून मुंबईकडे येताना चिवळे पॉईंट लागतो व त्या ठिकाणहून जुन्या मुंबई पुणे महामार्गाकडे वाहतूक आता वळवण्यात येणार आहे. याच मार्गावरून चार चाकी तसेच हलकी, ते मध्यम व अवजड स्वरूपाची वाहने जाणार आहेत. साधारणपणे दुपारी 12 ते 2 या दरम्यान ही वाहतूक जुन्या महामार्गाकडे वळविण्यात येणार आहे. दरड हटवण्याचे काम पूर्णपणे झाल्यानंतर ही लेन सुरू करण्यात येईल व वाहतूक पूर्व पदावर येईल अशी माहिती देखील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे.