Bank Loan : दिवाळीनिमित्त ही सरकारी बँक ग्राहकांना देत आहे खास ऑफर, वाचा….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Punjab National Bank Loan : सणासुदीच्या काळात बऱ्याच जणांना पैशांची गरज भासते, अशा स्थितीत लोकं बँकेच्या कर्जाची मदत घेतात. तुम्ही देखील सध्या लोन घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. आज आम्ही तुम्हाला अशा बँकांबद्दल सांगणार आहोत, जी तुम्हाला अगदी कमी दरात कर्ज ऑफर करत आहेत. 

बघायला गेलं तर सणासुदीच्या काळात सरकारी बँकांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक ऑफर आणल्या आहेत. अशातच पंजाब नॅशनल बँकेने (PNB) ‘दिवाळी धमाका 2023’ नावाची नवीन ऑफर आणली आहे.

या ऑफर अंतर्गत, PNB ग्राहकांना वार्षिक ८.४% दराने परवडणाऱ्या व्याजदराने गृहकर्ज मिळू शकते. त्याचप्रमाणे, बँक ऑफ बडोदा (BoB) आणि स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) सारख्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी देखील गृहकर्जासह इतर अनेक ऑफर लागू केल्या आहेत.

पंजाब नॅशनल बँक ऑफर

पंजाब नॅशनल बँकेचे ग्राहक 8.7% पासून सुरू होणाऱ्या व्याजदराने कार कर्ज घेऊ शकतात. याशिवाय, ग्राहकांना प्रक्रिया शुल्क आणि दस्तऐवजीकरण शुल्क पूर्णपणे माफ असतील. PNB कडून गृहकर्ज घेण्यास इच्छुक असलेल्यांसाठी व्याजदर ८.४% पासून सुरू होतात. या प्रकारच्या कर्जावर बँक कोणतेही आगाऊ प्रक्रिया शुल्क आणि दस्तऐवजीकरण शुल्क आकारणार नाही. गृहकर्जासाठी अर्ज पीएनबीच्या https://digihome.pnb.co.in/pnb/hl/ वेबसाइटवरही करता येईल.

याशिवाय तुम्ही पीएनबी वन ॲप वापरू शकता. अतिरिक्त माहितीसाठी तुम्ही टोल फ्री क्रमांक 1800 1800/1800 2021 वर कॉल करू शकता किंवा PNB शाखेला भेट देऊ शकता.

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ऑफर

सणासुदीचा काळ लक्षात घेऊन, SBI 1 सप्टेंबर 2023 पासून आपल्या ग्राहकांसाठी एक विशेष ऑफर मोहीम राबवत आहे. या मोहिमेची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२३ आहे. या विशेष मोहिमेअंतर्गत, SBI ग्राहकांना त्यांच्या क्रेडिट ब्युरो स्कोअरच्या आधारे मुदत कर्ज दिले जात आहे. क्रेडिट स्कोअर जितका जास्त असेल तितक्या जास्त सवलती व्याजदरात दिल्या जातील. उच्च क्रेडिट स्कोअर असलेल्या ग्राहकांना 65 बेसिस पॉइंट (0.65%) पर्यंत व्याजदरात सवलत दिली जाईल.

उदाहरणार्थ, जर SBI ग्राहकाचा CIBIL स्कोर ७०० ते ७४९ दरम्यान असेल, तर ते ८.७% प्रभावी व्याजदराने मुदत कर्ज घेऊ शकतात. यापूर्वी हा व्याजदर ९.३५ टक्के होता. SBI ग्राहकाचा CIBIL स्कोर ७५० ते ७९९ दरम्यान असेल तर मुदत कर्जावरील व्याजदर ८.६% असेल. SBI ग्राहकाचा CIBIL स्कोअर 800 किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर व्याज दर 9.15% च्या सामान्य दराऐवजी 8.6% असेल.

बँक ऑफ बडोदा (BoB) ऑफर

बँक ऑफ बडोदाचे ‘फीलिंग ऑफ फेस्टिव्हल विथ बीओबी’ हे विशेष सण मोहीम सुरू आहे. या विशेष मोहिमेअंतर्गत गृहकर्जाचे व्याजदर ८.४% पासून सुरू होतात आणि बँकेकडून कोणतेही प्रक्रिया शुल्क आकारले जात नाही. बँकेने सांगितले की, ग्राहक 8.7% प्रतिवर्षी व्याजदराने कार कर्ज घेऊ शकतात.