Top 5 Small Cap Funds : फक्त 5 हजारांच्या एसआयपीद्वारे कमवा लाखो रुपये !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Top 5 Small Cap Funds : मागील काही दिवसांपासून स्मॉल कॅप फंड गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यात यशस्वी ठरले आहेत. गेल्या तीन महिन्यांत या श्रेणीत सुमारे 11,000 कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक झाली आहे. येथे एवढी मोठी गुंतवणूक होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे या फंडांचा उच्च परतावा. चांगल्या परताव्यासाठी गुंतवणूकदारांनी नेहमीच एसआयपीमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य दिले आहे.

एसआयपी ही अशी गुंतवणूक आहे जी तुम्हाला भविष्यात श्रीमंत बनवते. येथील रिटर्न्स अनेक पटींनी वाढतात. आजच्या या लेखात आम्ही अशाच 5 फंडांबद्दल सांगितले आहे ज्यांनी केवळ 5000 रुपयांच्या SIP मधून 15 वर्षांत 52 लाख रुपयांपर्यंतचा निधी मिळवला आहे. चला तर मग…

डीएसपी स्मॉल कॅप फंड

15 वर्षांपूर्वी डीएसपी स्मॉल कॅप फंडमध्ये 5000 रुपयांची एसआयपी सुरू केली असती, तर आज या फंडाचे मूल्य 52.2 लाख रुपये झाले असते. याने गेल्या काही वर्षात सरासरी 21.1 टक्के परतावा दिला आहे.

फ्रँकलिन इंडिया स्मॉलर कंपनीज फंड

जर तुम्ही 15 वर्षांपूर्वी फ्रँकलिन इंडिया स्मॉलर कंपनीमध्ये 5000 रुपयांची SIP केली असती तर तुम्हाला आता 45.5 लाख मिळाले असते. येथे सरासरी परतावा 19.5 टक्के आहे.

कोटक स्मॉल कॅप फंड

कोटक स्मॉलकॅप फंडाने 15 वर्षांपूर्वी सुरू केलेल्या 5000 रुपयांच्या एसआयपीमधून 44.6 लाख रुपयांचा निधी तयार केला आहे. यांचा वार्षिक सरासरी परतावा 19.3 टक्के आहे.

एचडीएफसी स्मॉल कॅप फंड

एचडीएफसी स्मॉलकॅप फंडाने 5000 रुपयांच्या एसआयपीमधून 15 वर्षांत 42 लाख रुपयांचा निधी तयार केला. येथील वार्षिक सरासरी परतावा 18.6 टक्के आहे. येथे जर तुम्ही 15 वर्षांपूर्वी पैसे गुंतवले असते तर आता तुम्ही मालामाल झाला असता.

ICICI प्रुडेन्शियल स्मॉल कॅप फंड

ICICI प्रुडेन्शियल स्मॉलकॅप फंडाने 5000 रुपयांच्या SIP मधून 15 वर्षांत 36.6 लाख रुपयांचा निधी तयार केला. येथे सरासरी वार्षिक परतावा 17.1 टक्के आहे. जर तुम्ही येथे 15 वर्षांपूर्वी गुंतवणूक केली असती तर आता तुम्ही लखपती असता.

टीप : येथील गुंतवणूक जोखमीच्या असल्या तरी तुम्ही तज्ज्ञांच्या मदतीने येथे गुंतवणूक करण्याची योजना आखू शकता.