मोठी बातमी ! SBI अन युनियन बँक ऑफ इंडियानंतर आता ‘या’ बँकेने एफडीचे व्याजदर वाढवले, गुंतवणूकदारांना मिळणार बंपर रिटर्न

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

FD Interest Rate : 27 डिसेंबर 2023 रोजी सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आता स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या गुंतवणूकदारांसाठी एफडीचे व्याजदर वाढवले आहे. विशेष म्हणजे 27 डिसेंबरला युनियन बँक ऑफ इंडियाने देखील एफडीचे व्याजदर वाढवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. वास्तविक, या दोन बँकांनी एफडी व्याजदर वाढवल्यानंतर देशातील इतरही बँका एफडी चे व्याजदर वाढवतील असे बोलले जात होते.

विशेष म्हणजे झाले देखील तसेच, आता देशातील आणखी एका बड्या बँकेने एफडी व्याजदर वाढवण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे एफडी करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असे चित्र आता तयार होत आहे. आता गुंतवणुकीसाठी अलीकडे गुंतवणूकदारांकडे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत.

शेअर मार्केट, म्युच्युअल फंड यामध्ये देखील लाखो गुंतवणूकदार आपला पैसा गुंतवत आहेत. या ठिकाणी केलेले गुंतवणूक मात्र पूर्णपणे जोखीम पूर्ण असते. म्हणजेच या ठिकाणी पैसे बुडू देखील शकतात. शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये परतावा चांगला मिळतो मात्र अनेकदा शेअर बाजारावर आधारित या गुंतवणुकीत नुकसान देखील सहन करावे लागू शकते.

यामुळे अनेक जण आजही बँकेची एफडी किंवा पोस्ट ऑफिस आणि एलआयसीच्या योजनांमध्ये गुंतवणूक करण्याला पसंती दाखवतात. बँक एफ डी तसेच पोस्ट ऑफिस आणि एलआयसीच्या योजना या पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा केला जातो. यामुळे येथे गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या अधिक आहे.

ज्या लोकांना सुरक्षित गुंतवणूक करायची असते ते लोक नेहमीच बँकेच्या एफडीला प्राधान्य देतात. येथे गुंतवणूकदारांना निश्चितच कमी रिटर्न मिळतात मात्र या ठिकाणी केलेली गुंतवणूक हे पूर्णपणे सुरक्षित असते. दरम्यान एफडी करणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठे अपडेट समोर आले आहे.

ती म्हणजे एसबीआय आणि युनियन बँक ऑफ इंडियाच्या पाठोपाठ आता बँक ऑफ बडोदा ने देखील एफ डी वरील व्याज वाढवले आहे. यामुळे बँक ऑफ बडोदा मध्ये एफडी करणाऱ्यांना निश्चितच चांगला परतावा मिळू शकणार आहे. या बँकेकडून FD व्याजदरात १.२५ टक्के वाढ करण्यात आली आहे. बँक ऑफ बडोदाने 2 कोटी रुपयांपर्यंतच्या विविध मुदतीच्या मुदत ठेवींवरील व्याजदर 0.01 टक्क्यांवरून 1.25 टक्के एवढा केला आहे.

बँक ऑफ बडोदा ने सुधारित केलेले एफडी चे व्याजदर 29 डिसेंबर 2023 पासून लागू होणार आहेत. म्हणजेचं नवीन वर्षापूर्वीच हे नव्हे दर लागू होणार असून यामुळे गुंतवणूकदारांना नवीन वर्षाआधीच एक मोठी भेट मिळाली आहे. बँकेने सांगितल्याप्रमाणे 7-14 दिवसांच्या एफडीसाठी कमाल 1.25 टक्के वाढ करण्यात आली आहे.

या ठेवींवरील व्याजदर ३ टक्क्यांवरून ४.२५ टक्के करण्यात आला आहे. यानंतर 15 ते 45 दिवसांच्या कालावधीसाठी व्याजदर एक टक्क्याने वाढवून 4.50 टक्के एवढे करण्यात आले आहे. आता आपण हे सुधारित दर थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

बँक ऑफ बडोदाचे नवीन FD दर 
7 दिवस ते 14 दिवसांच्या FD वर आता 4.25 टक्के व्याज दिले जात आहे.
15 ते 45 दिवस FD केल्यास कालपासून 4.50 टक्के व्याज दिले जाऊ लागले आहे.
46 दिवस ते 90 दिवसांच्या एफडीवर आता 5.50 टक्के व्याज दिले जात आहे.
91 ते 180 दिवस FD केल्यास आता 5.6 टक्के दराने व्याज मिळणार आहे.
181 दिवस ते 210 दिवसांच्या एफडीवर आता 5.75 टक्के व्याज दिले जात आहे.
211 ते 270 दिवसांच्या FD वर 6.15 टक्के व्याज दिले जात आहे.
 271 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी FD केल्यास आता 6.25 टक्के व्याज मिळत आहे.
1 वर्षाच्या FD वर आता 6.85 टक्के व्याज देऊ केले जात आहे.
1 वर्ष ते 2 वर्षांच्या FD वर 6.85 टक्के व्याज दिले जात आहे.
२ ते ३ वर्षांच्या एफडीवर आता ७.२५ टक्के व्याज दिले जात आहे.
3 वर्ष ते 10 वर्षांपर्यंत FD वर आता 6.50 टक्के व्याज मिळत आहे.
10 वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी आता 6.25 टक्के व्याज दिले जात आहे.
३९९ दिवसांच्या एफडीवर आता ७.१५ टक्के व्याज दिले जात असल्याची माहिती बँकेच्या माध्यमातून समोर आली आहे.