Business Idea : अवघ्या 30 हजारांमध्ये सुरु करा मालामाल करणारा व्यवसाय ! दरमहा होईल 50000 कमाई

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Business Idea : कोरोना काळापासून अनेकजण नोकरी सोडून व्यवसाय करत आहेत. तसेच आजही असे अनेक तरुण आहेत ज्यांना नोकरी न करता स्वतःचा एक छोटासा व्यवसाय करायचा आहे. नोकरी करून अनेकांची आर्थिक गरज पूर्ण होत नाही. त्यामुळे अनेकजण व्यवसायाच्या शोधात आहेत.

तुम्हालाही छोटासा स्वतःच्या मालकीचा व्यवसाय सुरु करायचा असेल तर तो अगदी तुम्ही कमी बजेटमध्ये सुरु करू शकता. व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला जास्त भांडवलाची गरज नाही.

तुम्ही स्वतःच्या मालकीचा छोटासा व्यवसाय अगदी 30 हजार रुपयांमध्ये पूर्ण करू शकता. या व्यवसायातून तुम्ही दरमहा 50 ते 60 हजार रुपये कमवू शकता. त्यामुळे कमी बजेट व्यवसाय तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.

तुम्ही घरबसल्या ब्रेड बनवण्याचा व्यवसाय सुरु करू शकता. या व्यवसायासाठी तुम्हाला जास्त भांडवलाची गरज नाही. फक्त सुरुवातीला कच्चा माल आणि मशीनची आवश्यकता आहे. तसेच माल तयार झाल्यानंतर त्याचे मार्केटिंग करणे देखील आवश्यक आहे.

देशात चहाप्रेमींची संख्या जास्त आहे. दररोज सकाळी उठल्याबरोबर चहासोबत ब्रेड खात असतात. त्यामुळे त्याला बाजारात मागणी देखील जास्त आहे.

ब्रेडला हॉस्पिटलच्या कॅन्टीनमध्ये, हॉटेल आणि इतर अनेक ठिकाणी मागणी भरपूर आहे. ब्रेडचा वापर ब्रेड पकोडा, सँडविचसाठी देखील मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यामुळे तुम्ही ब्रेड बनवण्याच्या व्यवसायातून बक्कळ कमाई करू शकता.

व्यवसायासाठी लागणार कच्चा माल आणि उपकरणे

ब्रेडचा व्यवसाय सुरु करण्यासाठी तुम्हाला साखर, मीठ, मैदा, पाणी, फैट या वस्तू लागतील. ब्रेड बनवण्यासाठी ड्रॉपिंग मशीन, ओव्हन, ब्रेड कटिंग मशीन, मिक्सर मशीन आणि प्लॅटफॉर्म वजनाचे यंत्र अशी इलेक्ट्रिक उपकरणे लागतील.

ब्रेड कसा बनवायचा

ब्रेड बनवण्यासाठी सर्वात प्रथम पीठ चाळून घ्यावे लागेल आणि सर्व घटकांचे योग्य प्रमाण घालून ब्रेडचे मिश्रण तयार करावे लागेल. हे मिश्रण काही काळ पॅनमध्ये ठेवावे लागेल ज्याचे तापमान 90 अंश असेल.

काही वेळानंतर ब्रेडचा गोळा बाहेर काढा आणि थंड होण्यासाठी ठेवा. त्यानंतर तुम्ही ब्रेडच्या आकाराचे पीस कापून पॅकेटमध्ये पॅक ग्राहकांना किंवा डिलरला देऊ शकता.

व्यवसाय खर्च आणि नफा

तुम्हाला ब्रेडचा व्यवसाय सुरु करण्यासाठी अंदाजे 30 हजार रुपयांचा खर्च येईल. मात्र तुम्ही या व्यवसायातून दरमहा 50 ते 60 हजार रुपये कमवू शकता.

तुम्ही तुमच्या स्वतःच्या जागेत किंवा भाड्याच्या जागेत हा व्यवसाय सुरु करू शकता. व्यवसायाचे मार्केटिंग करणे खूप गरजेचे आहे.