DA Arrear Update: सणासुदीच्या कालावधीत केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळेल महागाई भत्ता थकबाकी? वाचा अपडेट

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

DA Arrear Update:- सध्या सणासुदीचे दिवस आणि काही महिन्यांमध्ये आगामी लोकसभा निवडणुका येऊ घातल्यामुळे केंद्र सरकारच्या माध्यमातून काही हिताचे निर्णय घेतले जाण्याची दाट शक्यता आहे. यामध्ये प्रामुख्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा विचार केला तर त्यांची महागाई भत्ता वाढ एक महत्त्वाचा मुद्दा आहे

आणि दुसरा महागाई भत्त्याशी संबंधित म्हणजेच महागाई भत्ता थकबाकी मिळण्यासाठी देखील खूप मोठ्या प्रमाणावर कर्मचारी संघटनांकडून मागणी करण्यात येत आहे. परंतु सध्या केंद्र सरकारच्या माध्यमातून ही डीए अर्थात महागाई भत्ता थकबाकीबाबत चांगली अपडेट येण्याची दाट शक्यता आहे.

 सणासुदीच्या कालावधीत पेन्शनधारकांना मिळणार 18 महिन्याची महागाई भत्ता थकबाकी?

केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शन धारक यांच्या महागाई भत्ता थकबाकी बाबत एक चांगली बातमी येण्याची शक्यता असून जर ही थकबाकी कर्मचाऱ्यांना मिळाली तर एक मोठी रक्कम सणासुदीच्या कालावधीत कर्मचाऱ्यांना मिळण्याची दाट शक्यता आहे. केंद्र सरकार कर्मचाऱ्यांच्या आणि पेन्शनधारकांच्या खात्यामध्ये 18 महिन्यांची महागाई भत्त्याची थकबाकीचे पैसे जमा करणार आहे.

त्यामुळे केंद्रीय कर्मचारी व पेन्शनधारकांना याचा खूप मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून याविषयी अजून कुठल्याही प्रकारचे अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाहीये. परंतु जर आपण अनेक मीडिया रिपोर्टचा विचार केला तर त्यानुसार सणासुदीच्या काळात महागाई भत्त्याची थकबाकी कर्मचाऱ्यांना दिली जाईल अशी साधारणपणे चर्चा आहे.

 या कालावधीतील आहे थकबाकी

केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या खात्यामध्ये महागाई भत्त्याच्या थकबाकीचे पैसे केंद्र सरकार वर्ग करणार आहे. कोरोना संसर्गाच्या कालावधीमध्ये केंद्र सरकारने तीन सहामाही हफ्त्यांची महागाई भत्त्याची थकबाकी दिली नव्हती. साधारणपणे हा कालावधी एक जानेवारी 2020 ते 30 जून 2021 असून या कालावधीतील महागाई भत्ता थकबाकीचे पैसे कर्मचाऱ्यांच्या आणि पेन्शनधारकांच्या खात्यात जमा करण्यात आलेले नाहीत व ही थकबाकी लवकरात लवकर मिळावी अशी मागणी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

आतापर्यंत केंद्र सरकारच्या माध्यमातून ही महागाई भत्त्याची थकबाकी देण्यात येईल एवढे आश्वासन देण्यात आलेले आह.परंतु त्यावर कुठल्याही प्रकारची पावले अद्याप पर्यंत उचललेले नाहीत. पुढील वर्षाच्या एप्रिल व मे मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार असून यामध्ये कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. तसेच काही मीडिया रिपोर्टचा विचार केला तर नोव्हेंबर पर्यंत देखील महागाई भत्ता थकबाकीची रक्कम कर्मचाऱ्यांना मिळणार आहे हे देखील सांगण्यात येत आहे.