DA Hike Update: केंद्र सरकारने ‘या’ कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात केली तब्बल 15 टक्क्यांची वाढ! वाचा ए टू झेड माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

DA Hike Update:- नुकतेच काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारक यांच्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या महागाई भत्त्यामध्ये चार टक्क्यांची वाढ केली. या अगोदर या कर्मचाऱ्यांना 42%इतका महागाई भत्ता मिळत होता. आता या चार टक्के वाढीसह तो 46% इतका मिळत आहे.

तसेच पुढील महागाई भत्ता वाढ ही जानेवारी 2024 मध्ये केली जाईल व त्यामध्ये पाच टक्क्यांची वाढ होईल अशी देखील एक शक्यता अनेक मीडिया रिपोर्ट मधून वर्तवण्यात येत आहे. त्यासोबतच येणाऱ्या काही दिवसांमध्ये देशात लोकसभेच्या निवडणुकीचे पडघम  वाजणार आहेत व सध्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची प्रक्रिया देखील सुरू असल्याने केंद्र सरकारच्या माध्यमातून काही हिताचे निर्णय नागरिकांसाठी घेतले जातील अशी एक शक्यता वर्तवण्यात येत आहे.

याच महागाई भत्त्याच्या बाबतीत पाहिले तर जे कर्मचारी पाचव्या आणि सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे पगार घेत आहेत अशा केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारच्या माध्यमातून घेण्यात आला असून तो कर्मचाऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे.

 या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 15 टक्क्यांची वाढ

याबाबत सविस्तर वृत्त असे की, जे कर्मचारी सातवा वेतन आयोगाच्या कक्षेमध्ये येतात त्या केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये केंद्र सरकारने चार टक्क्यांची वाढ केली व तो 46% इतका करण्यात आला. परंतु जे कर्मचारी सहाव्या वेतन आयोगाच्या कक्षेत येतात अशा केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांच्या कर्मचाऱ्यांकरिता मूळ वेतनावर मिळणारा महागाई भत्ता आता 231 टक्क्यांवरून 230% करण्यात आला असून त्यामध्ये नऊ टक्क्यांची वाढ करण्यात आलेली आहे.

महत्त्वाचे म्हणजे महागाई भत्त्यातील ही सुधारित वाढ ही एक जुलै 2023 पासून लागू होणार आहे. यासोबतच पाचव्या वेतन आयोगाच्या कक्षेमध्ये जे कर्मचारी आहेत त्यांच्या देखील महागाई भत्त्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे. जे कर्मचारी पाचव्या वेतन आयोगाच्या कक्षेमध्ये येतात त्यांच्यामध्ये दोन कॅटेगरीतील कर्मचारी आहेत.

ज्या कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनासह महागाई भत्त्याच्या 50% विलीनीकरणाला मंजुरी देण्यात आलेले नाही.त्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता सध्याच्या 462 टक्क्यांवरून 477 टक्के पर्यंत वाढवला जाण्याची शक्यता आहे. तसेच ज्या कर्मचाऱ्यांना मूळ वेतनासोबत महागाई भत्त्याच्या 50% विलीनीकरणाचा लाभ देण्यात आला आहे अशा कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 412 टक्क्यांवरून 427% केला जाण्याची शक्यता आहे. अशा पद्धतीने या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये तब्बल 15 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे.