7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी, लवकरच मिळणार फिटमेंट फॅक्टर, वाचा सविस्तर..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

7th Pay Commission : दिवाळीच्या शुभ पर्वावर केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी असून, खूप दिवसांपासून सुरु असलेली केंद्रीय कर्मचाऱ्यांची फिटमेंट फॅक्टरची मागणी सरकार लवकरच मान्य करेन अशी शक्यता वर्तवली जात आहे. यासोबतच रखडलेले डीए थकबाकीचे पैसे सुद्धा लवकरच खात्यात जमा होऊ शकतात अशीसुद्धा शक्याता आहे. जाणून घ्या याबद्दल.

गेले अनेक दिवस सुरु असलेली केंद्रीय कर्मचाऱ्यांची फिटमेंट फॅक्टरची मागणी आणि डीए थकबाकीचे पैसे या दोन्ही गोष्टींवर सरकार लवकरच निर्णय घेणार असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, जर या दोन्ही गोष्टींचा निर्णय घेतल्यास हे वर्ष कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आनंदाचे ठरेल.

दरम्यान,फिटमेंट फॅक्टर आणि डीएच्या थकबाकीबाबत सरकारने अद्याप अधिकृतपणे कोणतेही माहिती दिलेली नाही आहे. मात्र मीडिया रिपोर्ट्सनुसार लवकरच याबाबत निर्णय होण्याचा अंदाज बांधला जात आहे.

फिटमेंट फॅक्टर

सध्या कर्मचाऱ्यांना 2.60 पट फिटमेंट फॅक्टरनुसार पगार मिळत आहे. तर हा फॅक्टर आता 3.0 पटीने वाढवणे अपेक्षित आहे, ज्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.

असे झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या किमान मूळ वेतनात लक्षणीय वाढ होईल. इतकेच नाही तर काही रिपोर्ट्सनुसार मूळ वेतन थेट 18 हजार रुपयांवरून 26 हजार रुपयांपर्यंत वाढणार आहे.

यासह, मूळ वार्षिक वेतन हे 96,000 रुपयांनी वाढणार आहे, दरम्यान, याचा थेट फायदा लाखो कर्मचाऱ्यांना तर होणारच आहे. मात्र असेल झाल्यास अनेकांची खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी होणार आहे.

दरम्यान, कोरोना काळातील नुकसान हे कारण पुढे करून सरकारने गेले 18 महिन्यांची डीएची थकबाकी पाठवली नाही, मात्र आता सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी साडेतीन वर्षांचे पैसे आता खात्यात जमा होतील अशी अशा आहे. दरम्यान, सरकारने अद्याप याबाबत अधिकृतपणे कोणतीही माहिती दिली नाहीये.