EPFO Rule: लग्न झाल्यानंतर हे काम नक्की करा! नाहीतर अडकू शकतात तुमचे पैसे, वाचा माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

EPFO Rule:- कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ही कर्मचाऱ्यांचा प्रॉव्हिडंट फंड अर्थात ईपीएफ खात्याचे नियमन करत असते व या संबंधीचे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचा संपूर्ण अधिकार हा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओला असतो. कारण आपल्याला माहित आहे की जेव्हा आपण नोकरी करत असतो

तेव्हा आपल्या पगारांमधून दर महिन्याला काही रक्कम पीएफ करिता कापली जात असते व तेवढीच रक्कम ही नियोक्त्या मार्फत आपल्या खात्यात जमा होत असते. अशा पद्धतीने आपल्या खात्यात पीएफ स्वरूपात जो काही पैसा जमा होतो तो रिटायरमेंटनंतर पुढच्या आयुष्य आर्थिक दृष्ट्या सुरक्षित करण्यासाठी खूप महत्त्वाचा असतो.

एवढेच नाही तर ईपीएफओ सदस्याचा जर मृत्यू झाला तरी त्याच्या कुटुंबासाठी याचा फार मोठा आर्थिक दृष्टिकोनातून फायदा होतो. परंतु यासंबंधी देखील अनेक प्रकारचे अनेक छोटे-मोठे नियम असतात. त्यामुळे एखादी छोटीशी चूक देखील तुमचे पैसे अडकवण्यासाठी कारणीभूत यामध्ये ठरू शकते. यातील जर एक नियम पाहिला तर व्यक्तीचे लग्न झाल्यानंतर ईपीएफ आणि ईपीएसचे नियम बदलले जातात व त्याकडे लक्ष देणे खूप गरजेचे असते.

 लग्न झाल्यानंतर नॉमिनेशनमध्ये करावा लागतो बदल

तुम्ही ईपीएफओचे सदस्य आहात तर लग्न झाल्यानंतर एपीएफ आणि ईपीएस मधील नामांकन लग्नानंतर रद्द होण्याची शक्यता असते. यासंबंधीचा सर्व उल्लेख हा ईपीएफओ स्कीम 1952 च्या नियमांमध्ये करण्यात आलेला आहे. या नियमानुसार बघितले तर विवाह अगोदर ईपीएफ आणि ईपीएससाठी जो सदस्य नॉमिनेटेड असतो

किंवा नामनिर्देशित केलेले असते ते लग्नानंतर रद्दबातल किंवा अवैध ठरते. म्हणजेच तुम्हाला लग्न झाल्यानंतर पुन्हा नामांकन करावे लागते. लग्नाच्या अगोदर तुमचे जे काही नामांकन असेल ते लग्न झाल्यानंतर आपोआप रद्द होते. त्यामुळे लग्नानंतर नामांकन केल्यानंतर तुमच्या पत्नीला याचे फायदे मिळतात.

 ईपीएफमध्ये घरबसल्या नामांकन कसे करावे?

1- याकरिता सगळ्यात अगोदर ईपीएफओ च्या वेबसाईटवर जावे व त्या ठिकाणी लॉगिन करणे गरजेचे असते.

2- त्यानंतर तुम्हाला व्ह्यू या विभागात जाऊन प्रोफाईलवर जाणे गरजेचे असते.

3- या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला नॉमिनेशन वर क्लिक करावे लागेल.

4- त्यानंतर तुमचे प्रोफाईल ओपन होते व त्या ठिकाणी तुम्हाला प्रोसिड यावर क्लिक करावे लागेल.

5- प्रोसिडवर क्लिक केल्यानंतर फॅमिली डिक्लेरेशनवर जावे आणि तुम्हाला होय आणि नाहीचा पर्याय त्या ठिकाणी मिळतो.

6- या ठिकाणी तुम्हाला एस म्हणजेच होय या पर्यायावर क्लिक करावे लागते.

7- नंतर एक नवीन पेज उघडते व त्या ठिकाणी तुम्हाला फॅमिली डिटेल्स वर क्लिक करावे लागेल.

8- या ठिकाणी तुम्हाला तुमच्या पत्नीचे नाव आणि आधार तपशील इत्यादी द्यावे लागेल.