Farmer Scheme: शेळीपालन, कुक्कुटपालन सारख्या जोडधंद्यांसाठी मिळेल 1 कोटी गुंतवणुकीवर 50 टक्के अनुदान! वाचा माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Farmer Scheme:- शेती आणि शेतीपूरक जोडधंद्यांसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक योजना राबविण्यात येत असून या योजनांच्या माध्यमातून कृषी क्षेत्राचा व त्या अनुषंगाने शेतकऱ्यांचा आर्थिक दृष्टिकोनातून विकास व्हावा हा महत्त्वाचा दृष्टिकोन सरकारचा आहे.

शेती व्यवसायाला जर जोडधंद्यांची साथ राहिली तर शेतकरी आर्थिक दृष्टिकोनातून स्वयंपूर्ण होऊ शकतात. कारण नुसते शेतीवर अवलंबून राहणे हे नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी योग्य राहिलेले नाही. त्यामुळे शेतकरी देखील आता विविध प्रकारचे जोडधंद्यांच्या माध्यमातून आर्थिक प्रगती साधण्यासाठी प्रयत्न करताना दिसून येत आहेत.

त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध प्रकारच्या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अशा व्यवसाय उभारणीसाठी अनुदान दिले जाते. या अनुषंगाने शेळीपालन तसेच कुक्कुटपालन सारख्या जोडधंद्यांना अनुदान स्वरूपात मदत व्हावी याकरिता राष्ट्रीय पशुधन अभियान योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येत असून ही एक महत्वपूर्ण योजना आहे. याच योजनेची माहिती आपण या लेखात बघणार आहोत.

 काय आहे राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेचे स्वरूप?

केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्रालयाच्या माध्यमातून राष्ट्रीय पशुधन अभियान ही एक महत्वपूर्ण योजना राबवली जात असून या योजनेच्या माध्यमातून रोजगाराची निर्मिती तसेच उद्योजकता विकास आणि पशु उत्पादकता वाढावी याकरिता प्रयत्न करण्यात येत असून शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी अंडी व मांस उत्पादन आणि त्यासोबतच शेळी व मेंढीपालनातून लवकर उत्पादन करता येणे शक्य व्हावे

या दृष्टिकोनातून या अभियानाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत. या योजनेच्या माध्यमातून शेतकरी एक हजार कुक्कुट पक्षांचे संगोपन व अंडी उबवण केंद्राची स्थापना करू शकतात. एवढेच नाही तरी शंभर ते पाचशे पर्यंत शेळी मेंढी गटाची स्थापना देखील या योजनेचा लाभ घेऊन केली जाऊ शकते. या सगळ्या प्रयत्नातून शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्न वाढवण्याकरिता खूप मोठी मदत होऊ शकते.

 या योजनेचा फायदा कोणाला मिळू शकतो किंवा कोण अर्ज करू शकतो?

राष्ट्रीय पशुधन अभियानाच्या माध्यमातून शेतकरी मुरघास (सायलेज), वैरणीसाठी विटा( ब्लॉक ) युनिट आणि साठवणूक युनिट देखील शेतकऱ्यांना उभारता येणार आहेत. याकरिता शेतकरी जो काही प्रकल्प उभारतील त्या प्रकल्पाच्या एकूण किमतीच्या 50% अनुदान शेतकऱ्यांना दिले जाणार आहे.

यामध्ये वेगवेगळे प्रकल्पांकरिता अनुदानाचे मर्यादा वेगवेगळे असते. हे अनुदान शेतकऱ्यांना भारतीय लघुउद्योग विकास बँकेच्या माध्यमातून देण्यात येते. या योजनेच्या माध्यमातून मिळणारा अनुदानाचा फायदा हा शेतकरी, उद्योजक तसेच शेतकरी उत्पादक संस्था, महिला बचत गट आणि शेतकरी सहकारी संघटना घेऊ शकणार आहेत.

 या योजनेचा लाभ घेण्यासाठी महत्त्वाच्या अटी

1- यासाठी संबंधित अर्जदाराने प्रकल्प चालवण्याकरिता आवश्यक प्रशिक्षण घेणे गरजेचे असून किंवा प्रशिक्षित तज्ञांना नियुक्त करणे गरजेचे आहे.

2- तसेच शेळी व मेंढीपालन तसेच कुक्कुट व वराहपालन इत्यादी बाबत अनुभव असणे गरजेचे आहे.

3- बँक कर्ज मंजुरी किंवा स्व अर्थसहायित प्रकल्प असतील तर बँकेची हमी आवश्यक आहे.

4- उद्योग उभारण्यासाठी स्वतःची जमीन असणे गरजेचे आहे. स्वतःची जमीन नसेल तर भाडेतत्त्वावर घेतलेली जमीन असणे आवश्यक राहील.

5- तसेच महत्त्वाचे म्हणजे अर्जदाराकडे केवायसी साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे आहे.

 लाभ घेण्यासाठी कुठे अर्ज करावा?

यासाठी अर्ज करायचा असेल तर शेतकरी www.nim.udyammitra.in या वेबसाईटला भेट देऊन अर्ज करू शकतात.

 किंवा

तुमच्या जवळच्या सरकारी पशुवैद्यकीय दवाखाना किंवा जिल्ह्याचा/ तालुक्याचा पशुसंवर्धन विभाग या ठिकाणी संपर्क करणे गरजेचे राहील.