Farming Business Idea: या वनस्पतीचे तेल विकले जाते 20 हजार रुपये प्रति लिटर! एका एकर मधून 4 लाखांचे उत्पन्न शक्य

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Farming Business Idea:- बहुसंख्य शेतकरी आता पारंपारिक पिकांची लागवड आणि शेती पद्धती सोडून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वेगवेगळ्या पिकांची लागवड करत असून या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक उत्पन्न देखील मिळवत आहेत. पण यामध्ये वेगवेगळ्या पिकांचा विचार केला तर अनेक प्रकारचे विदेशी भाजीपाला पिके तसेच वेगवेगळ्या प्रकारची फळबागा, औषधी वनस्पतीची लागवड प्रामुख्याने शेतकरी मोठ्या प्रमाणावर करत असून यामुळे शेती क्षेत्राला एक प्रगत स्वरूप प्राप्त झाले आहे.

याच पद्धतीने जर आपण एका फुलझाड प्रकारामध्ये असलेल्या वनस्पतीचा विचार केला तर याच्या लागवडीतून शेतकरी लवकर श्रीमंत होऊ शकतात. या वनस्पतीच्या तेलाला बाजारामध्ये खूप मोठी मागणी असून औषधी, साबण तसेच परफ्युम आणि इतर सौंदर्य उत्पादनांमध्ये या वनस्पतीच्या तेलाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. भारतामध्ये देखील आता मोठ्या प्रमाणावर या वनस्पतीची लागवड केली जात आहे.

असे हे महत्वपूर्ण असलेले सुगंधी वनस्पती किंवा याला आपण औषधी वनस्पती देखील म्हणता येईल असे पीक म्हणजे जिरेनियम हे होय. तांबडी किंवा पांढरी फुले येणारे हे एक फुलझाड असून याच्या फुलांपासून तेल काढले जाते. या तेलाचा वापर औषधांव्यतिरिक्त इतराने कारणांसाठी केला जातो. या फुलाला गुलाबासारखे वास येतो. हे तेल अरोमाथेरपी तसेच सौंदर्य उत्पादने, परफ्यूम आणि सुगंधी साधनांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जाते.

 कोणत्या ठिकाणी करू शकतात जिरेनियम शेती?

जिरेनियम लागवड तुम्ही कोणत्याही जमिनीमध्ये करू शकतात. परंतु तरी देखील वालुकामय चिकन माती चांगली मानली जाते. या पिकाला ऊसापेक्षा चार पट कमी पाणी लागते म्हणजेच कमी पाऊस पडणाऱ्या परिसरामध्ये देखील याची लागवड करता येऊ शकते. तसेच सर्व प्रकारचे हवामान याच्या चांगल्या उत्पादनासाठी  उत्तम असते. परंतु तरीदेखील कमी आद्रता असलेले सौम्य हवामान जिरेनियमची चांगली वाढ आणि उत्पादनासाठी उत्तम मानले जाते.

जिरेनियम पिकाचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या पिकाला कुठल्याही प्रकारचे जंगली प्राणी खात नसल्यामुळे त्यांच्यापासून नुकसान होण्याची भीती नसते. तसेच कुठल्याही प्रकारचा रोगांचा प्रादुर्भाव होत नसल्यामुळे रासायनिक औषधांची फवारणी करण्याची गरज नाही. एका एकर मध्ये दहा हजार ते अकरा हजार रोपांची लागवड याची करता येते. ही रोपे तीन किंवा चार फूट दोन सरींमधील अंतर ठेवून एक ते दीड फूट रोपांमधील अंतर ठेवून यांची लागवड करतात.

पाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर अनिवार्य आहे. विशेष म्हणजे एकदा का तुम्ही लागवड केली तर तीन ते पाच वर्षांपर्यंत याचे पीक येत राहते. एका एकर मध्ये एका वर्षात साधारणपणे 40 टन बायोमास उत्पादनातून 30 ते 40 किलो तेल मिळते. एका वर्षात तीन ते चार वेळा कापणी होते व साडेतीन ते सव्वा चार लाखापर्यंत उत्पन्न या माध्यमातून मिळू शकते.

 जिरेनियमच्या एक टन पाल्यापासून मिळू शकते एक किलो सुगंधी तेल

जिरेनियम ची लागवड केल्यानंतर वर्षातून चार वेळा त्याचा पाला कापता येतो व एक कापणीत साधारणपणे दहा ते पंधरा टन पाला निघतो आणि एक टन पाल्यापासून एक किलो सुगंधी तेल निघते. याच्या तेलाला भारतातच नव्हे तर जागतिक पातळीवर खूप प्रचंड मागणी आहे. सौंदर्य प्रसाधने तयार करणाऱ्या वेगवेगळ्या कंपन्यांसह पान मसाला उद्योग, साबण तसेच अत्तर, सुगंधी उद्योग तसेच सुगंधी उपचार आणि औषध निर्माण कंपन्यांकडून या तेलाची खरेदी केली जाते.

सुरुवातीला एकरी 70 ते 80 हजार रुपये याला खर्च येतो. इतर पिकांप्रमाणे या पिकासाठी फवारणी व खते लागत नसल्यामुळे 75% पर्यंत खर्च कमी लागतो. एका एकर मधून 30 ते 40 लिटर तेल एका वर्षात मिळू शकते व एक लिटर तेल जागेवर बारा हजार ते साडेबारा हजार रुपये किमतीत विकले जाते.

म्हणजेच एका एकर मधून चार ते पाच लाखांचे उत्पन्न आरामात मिळू शकते. भारतातील मागणीचा विचार केला तर प्रत्येक वर्षाला दोनशे ते तीनशे टनांची मागणी आहे. परंतु सध्या भारतामध्ये वर्षाला 10 ते 20 टन तेलाची निर्मिती अजून पर्यंत होत नाही. त्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणात या सुगंध औषधी वनस्पतीची लागवड करणे शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. पारंपारिक पिकांपेक्षा जिरेनियम हे पीक दुप्पट नफा देणारे असून शंभर टक्के उत्पन्न देणारी पीक आहे.

 काढणी कशी करतात?

जिरेनियमच्या फांद्यांची तोडणी केली जाते व त्यापासून तेल बनवले जाते. ज्या भागामध्ये जास्त पाऊस असतो त्या ठिकाणी याची काळजी जास्त करून  घ्यावी लागते. कारण जास्त पावसामुळे पिकाच्या खालच्या भागातील फांद्या खराब होण्याची शक्यता असते. परंतु इतर ऋतूंमध्ये पिकावर कुठल्याही प्रकारचा परिणाम होत नाही. जिरेनियम तेलापासून औषधे, सौंदर्य प्रसाधने तसेच साबण आणि डिटर्जंट शाम्पू, सेंट आणि अगरबत्ती पावडर इत्यादी वस्तू तयार केल्या जातात व या कारणांमुळे याला खूप मोठी मागणी आहे. एवढेच नाही तर कापणी केल्यानंतर उरलेल्या पालापाचोळ्यापासून खताची निर्मिती देखील करता येते.