Fish Farming: विदेशातील सव्वा लाख रुपये पगाराची नोकरी सोडली! मत्स्यपालनातून कमवत आहेत वार्षिक 10 लाख उत्पन्न

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Fish Farming :- शेतीसोबत भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर विविध प्रकारचे जोडधंदे केले जातात. यामध्ये प्रामुख्याने पशुपालन हा व्यवसाय कित्येक वर्षांपासून शेतकरी करत असून त्यासोबतच आता मत्स्यपालन, कुक्कुटपालन हे व्यवसाय देखील व्यावसायिक दृष्टिकोनातून शेतकरी करू लागले आहेत. शेतीमध्ये ज्या प्रमाणात आधुनिक तंत्रज्ञानाने क्रांती घडवली त्या दृष्टिकोनातून आता मत्स्यपालन आणि इतर जोडधंद्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञान येऊ घातले आहे.

त्यामुळे अनेक शेतकरी आता वेगवेगळ्या प्रकारचे जोडधंदे करताना आपल्याला दिसून येतात. यामध्ये जर आपण कुक्कुटपालनाचा विचार केला तर अगोदर परसातील कुक्कुटपालन ही संकल्पना कधीच मागे पडली असून अगदी मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून कुक्कुटपालन व्यवसाय केला जात आहे व अशीच परिस्थिती सध्या मत्स्यपालन व्यवसायाची देखील दिसून येते.

शेतकरी शेतामध्ये शेततळे उभारून किंवा मच्छीपालनाच्या बायोफ्लॉक सारख्या पद्धती वापरून मोठ्या प्रमाणावर हा व्यवसाय करत असून या माध्यमातून चांगला आर्थिक नफा देखील मिळवत आहेत. त्याचेच जर उदाहरण घ्यायचे जर ठरले तर आपण बिहारमधील दोन भावांचे उदाहरण घेऊ शकतो. त्यांनी मत्स्य पालन व्यवसायामध्ये प्रचंड पैसा तर कमवलाच परंतु इतरांना रोजगाराच्या संधी देखील निर्माण करून दिले आहेत. त्यांचीच यशोगाथा आपण या लेखात बघणार आहोत.

 सिंह बंधूंची मत्स्यपालन व्यवसायातील यशोगाथा

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, बिहार राज्यातील गया जिल्ह्यातील इमामगंज तालुक्यातील पडरिया या छोट्याशा गावात राहणारे करणवीर सिंह आणि विशाल कुमार सिंह यांनी मासेमारी व्यवसाय सुरू केला व त्या माध्यमातून खूप चांगल्या प्रमाणावर यश मिळवले आहे. जर या दोघ भावांपैकी आपण करणवीर त्यांची पार्श्वभूमी पाहिली तर त्यांनी दिल्लीतून हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण पूर्ण केले व बारा वर्षे दुबईमध्ये एक लाख 25 हजार रुपये पगारावर हॉटेलमध्ये काम केले.

परंतु त्यानंतर अख्या जगामध्ये कोरोनाचे सावट आल्यामुळे लॉकडाऊन लागले व त्यांना दुबईवरून गावी परत यायला लागले. ते गावी परत आले परंतु दुबई परत गेलेच नाही.कारण त्यांनी गावी आल्यानंतर काहीतरी व्यवसाय गावातच सुरू करावा असा प्लानिंग केला व अनेक एक्सपर्ट लोकांना भेटून आधुनिक पद्धतीने शेती आणि मत्स्यपालन व्यवसाय कसा करता येईल याबद्दलची सगळी योजना आखली. विशाल कुमार यांची पार्श्वभूमी पाहिली तर दिल्लीमध्ये त्यांचा स्वतःचा लॅम्प सेटचा व्यवसाय होता. परंतु त्यांचा हा व्यवसाय देखील लॉकडाऊन मध्ये बंद पडला व त्यांनाही गावी यावे लागले.

अगोदरच एका भावाने शेती आणि मत्स्यपालन व्यवसाय आधुनिक पद्धतीने करावा हा प्लॅनिंग केलेला होता व त्यालाच विशाल कुमार यांनी साथ दिली व दोघे मिळून दोन एकर क्षेत्रावर खाजगी तलाव आणि नऊ एकर क्षेत्रावर तलाव भाडेतत्त्वावर घेतला व मत्स्यपालन व्यवसाय सुरू केला. यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत त्यांनी गावातच लाखो रुपये कमवण्यामध्ये यश मिळवले.

या व्यवसायाविषयी माहिती देताना करणवीर यांनी सांगितले की अगोदर दीड वर्ष खूप गुंतवणूक करावी लागली परंतु त्या मानाने कमाई कमी होती. परंतु यामध्ये हळूहळू आर्थिक उत्पन्न वाढायला लागले व आता ते एका वर्षांमध्ये दहा लाख पेक्षा जास्तीचा पैसा या माध्यमातून मिळवत आहे.

त्यांच्या या अलौकिक कामगिरीचा गौरव बिहारच्या कृषी मंत्र्यांनी देखील केला आहे. दोघा भावांनी सुरू केलेल्या या मत्स्य शेतीमध्ये प्रामुख्याने ते इंडियन मेजर कार्प, ग्रास स्कार्प, रूपचंदा तसेच पहाडी मासे इत्यादी माशांच्या प्रजाती पाळतात व स्थानिक बाजारपेठेमध्ये ते विक्रीचे नियोजन करतात.

अशा पद्धतीने जर आपण या दोघ भावांचे उदाहरण पाहिले तर नक्कीच व्यवसायामध्ये जर व्यवस्थित कष्ट घेतले व प्लानिंग केली तर खूप काही पैसा गावी राहून कमावता येतो.