Goat Rearing: शेळीपालनात ‘या’ दोन प्रजातींच्या शेळ्या पाळा आणि लाखो रुपये कमवा! वाचा माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Goat Rearing:- शेळीपालन व्यवसाय हा कमीत कमी जागेत आणि कमीत कमी खर्चात करता येणारा व्यवसाय असून खूप चांगल्या पद्धतीचा आर्थिक नफा मिळवून देण्याची क्षमता या व्यवसायामध्ये असते. भारतामध्ये कृषीनंतर पशुपालन व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जातो व त्यातल्या त्यात शेळी पालन व्यवसाय देखील आता व्यावसायिक दृष्टिकोनातून केला जात असून अनेक सुशिक्षित तरुण आता या व्यवसायाकडे वळले आहेत.

शेळीपालन व्यवसाय यशस्वी होण्याच्या दृष्टिकोनातून  प्रत्येक गोष्टींच्या अनुषंगाने व्यवस्थापन जितके गरजेचे आहे तितकेच शेळीपालनासाठी शेळ्यांच्या जातिवंत जातींची निवड करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. याचा अनुषंगाने या लेखात आपण शेळ्यांच्या दोन महत्त्वाच्या जातींविषयी माहिती पाहणार आहोत.

 शेळ्यांच्या या दोन जाती आहेत महत्वपूर्ण

1-ब्लॅक बंगाल शेळी या जातीच्या शेळ्या प्रामुख्याने पश्चिम बंगाल तसेच झारखंड, उत्तर ओरिसा, आसाम इत्यादी राज्यांमध्ये प्रामुख्याने पाळले जातात. या प्रजातीच्या शेळ्यांची शारीरिक रचना पाहिली तर त्यांचा रंग काळा व भुरा तसेच सफेद असतो व उंची लहान असते. नर आणि मादी या दोघांमध्ये पुढे असलेली सरळ शिंगे असतात व या शिंगांची लांबी तीन ते चार इंचापर्यंत असते

ब्लॅक बंगाल जातीच्या शेळ्यांचे शरीर पुढच्या बाजूने मागच्या बाजूपर्यंत जास्त रुंद आणि मधल्या भागात जास्त जाड असते. कान हे छोटे आणि मागच्या बाजूने झुकलेली असतात. जर आपण या जातीच्या नराचे वजन पाहिले तर ते 18 ते 20 किलो पर्यंत असते व मादी शेळीचे वजन हे 15 ते 18 किलो पर्यंत असते. या जातीच्या शेळीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे दररोज तीन ते चार महिन्यांपर्यंत 300 ते 400 मिली दूध देते.

2- सिरोही शेळी जातीची शेळी झारखंड राज्याच्या व्यतिरिक्त राजस्थान, उत्तर प्रदेश आणि गुजरात या राज्यांमध्ये प्रामुख्याने पाळली जाते.या जातिच्या शेळीचा आकार छोटा असतो व रंग भुरा असतो. तसेच शरीरावर भुऱ्या रंगाचे ठिपके दिसून येतात तसेच कान चपटे असून लटकल्यासारखे दिसतात.

सिरोही शेळीचे शिंगे मागच्या बाजूला वळलेले दिसतात. शिरोही जातीच्या शेळीच्या प्रौढ नराचे वजन 50 किलो पर्यंत असते तर मादी शेळीचे वजन 40 किलो पर्यंत भरते. सिरोही जातीची शेळी प्रतिवेत सरासरी 65 लिटर दूध देऊ शकते. दोन्ही जातींच्या शेळ्या कमीत कमी पाच ते सहा हजार रुपयांपर्यंत मिळतात. परंतु शेळीपालनासाठी या दोन्ही जाती खूप फायदेशीर ठरतात.