Government Scheme : ‘या’ लोकांसाठी खुशखबर ! सरकार देणार फक्त 120 महिन्यांत दुप्पट पैसे ; जाणून घ्या नेमकं प्रकरण काय

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Government Scheme : आज तुम्ही तुमच्या भविष्यासाठी सुरक्षित गुंतवणूक शोधात असाल तर आम्ही तुम्हाला आज एका केंद्र सरकारच्या एका भन्नाट योजनेबद्दल माहिती देणार आहोत. या योजनेत तुम्हाला अवघ्या 120 महिन्यांत दुप्पट पैसे मिळणार आहे.

तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो आम्ही येथे पोस्ट ऑफिसच्या किसान विकास पत्र या योजनेबद्दल तुम्हाला माहिती देत आहोत. या योजनेत तुम्ही गुंतवणूक करून कमी वेळेत जास्त पैसे कमवू शकतात. या योजनेत कोणताही प्रौढ नागरिक त्याचे खाते उघडू शकतो. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही 3 लोकांच्या नावाने संयुक्त खाते देखील उघडू शकता.

किसान विकास पत्र मध्ये व्याज दर किती आहे?

स्मॉल सेव्हिंग्ज स्कीममध्ये, व्याज दर दर तीन महिन्यांनी म्हणजे त्रैमासिक आधारावर निश्चित केले जातात. 1 जानेवारी 2023 रोजी सरकारने किसान विकास पत्रामध्ये उपलब्ध व्याजदरात 20 आधार अंकांची वाढ केली आहे. सध्या त्यावर वार्षिक आधारावर 7.2 टक्के दराने व्याज मिळते. तुम्ही या योजनेत रु. 1,000 ची गुंतवणूक सुरू करू शकता. यामध्ये जास्तीत जास्त गुंतवणुकीला मर्यादा नाही. किसान विकास पत्रातील तुमच्या गुंतवणुकीची रक्कम सध्याच्या व्याजदरानुसार 120 महिन्यांत म्हणजे 10 वर्षांत दुप्पट होते.

मला करात सूट मिळेल का?

बँक बाजारने दिलेल्या माहितीनुसार, किसान विकास पत्र (KVP) योजना आयकर कायदा 1961 अंतर्गत येते. त्यामुळे यामध्ये 80C अंतर्गत कर सूट मिळू शकते. जर तुम्ही या योजनेत 50,000 रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक केली तर तुम्हाला तुमचे पॅन कार्ड तपशील शेअर करावे लागतील. तुम्ही हमी म्हणून किसान विकास पत्र योजनेचा वापर करून कर्ज देखील घेऊ शकता.

किसान विकास पत्राचा इतिहास काय आहे?

भारतीय पोस्ट ऑफिसने 1988 मध्ये ही योजना सुरू केली. ही योजना भारत सरकारने देशातील लहान बचतीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि गुंतवणूकदारांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आणली होती. ही योजना सुरू झाल्यापासून खूप लोकप्रिय झाली असली तरी 2011 मध्ये या योजनेचा मनी लॉन्ड्रिंगसाठी गैरवापर होऊ शकतो हे सरकारच्या लक्षात आले.

2014 मध्ये अनेक बदलांसह ही योजना पुन्हा एकदा सुरू करण्यात आली. या बदलांमध्ये एकाचवेळी 50 हजारांपेक्षा जास्त गुंतवणुकीसाठी पॅनकार्ड आवश्यक करण्यात आले असून 10 लाखांपेक्षा जास्त गुंतवणुकीसाठी उत्पन्नाच्या स्रोताचा पुरावा अनिवार्य करण्यात आला आहे.

हे पण वाचा :- PM Jan Dhan Yojana: जन धन खातेधारकांसाठी लॉटरी ! सरकार खात्यात पाठवत आहे ‘इतके’ हजार रुपये ; जाणून घ्या तपशील