Home Loan Tips: नोकरी नसताना देखील मिळेल तुम्हाला होमलोन! पूर्ण करावे लागतील हे नियम व अटी, वाचा डिटेल्स

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Home Loan Tips:- महागाईच्या या कालावधीमध्ये जागा घेऊन घर बांधणे किंवा बांधलेले घर विकत घेणे यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागतो. त्यातल्या त्यात मोठ्या शहरांमध्ये जर घर बांधायचे असेल किंवा विकत घ्यायचे असेल तर खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक बजेट तयार करणे गरजेचे असते. परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणावर पैसा प्रत्येकाकडेच असतो असे नाही. त्यामुळे स्वतःच्या मनातील आणि स्वप्नातील घर घेण्याकरता बरेच व्यक्ती बँकांच्या साहाय्याने गृहकर्जाचा पर्याय निवडतात.

गृहकर्ज अर्थात होमलोनच्या माध्यमातून सामान्य पगारदार व्यक्ती देखील स्वतःच्या घराचे स्वप्न साकार करते. परंतु गृह कर्जाच्या बाबतीत विचार केला तर साधारणपणे नोकरी करणाऱ्या लोकांना सहजपणे गृह कर्ज दिले जाते. यामध्ये वेतन पावती म्हणजे सॅलरी स्लिप बघितली जाते हा एक नियम आहे. तसेच होमलोन मिळवण्यासाठीच्या जे काही नियम आहेत ते देखील खूप क्लिष्ट आहेत.

जे लोक व्यवसाय करतात म्हणजेच ज्यांचे महिन्याला येणारे उत्पन्न फिक्स म्हणजेच निश्चित नसते अशा लोकांना होमलोन मिळण्यामध्ये अडचणी निर्माण होतात. परंतु काही बँका स्वयंरोजगार किंवा व्यवसाय करणाऱ्या लोकांना देखील कर्ज देतात. यामध्ये बँका काही गोष्टींची खात्री करतात व त्यांची खात्री पटल्यावरच ते स्वयंरोजगार असणाऱ्या व्यक्तीला कर्ज देऊ शकतात. अशाप्रसंगी बँक कोणकोणत्या पद्धतीची खात्री करते किंवा कोणत्या बाबी तपासते याची माहिती आपण या लेखात घेऊ.

 नोकरी नसताना देखील मिळू शकते होम लोन

1- वय ठरते महत्त्वाचे समजा तुम्ही होम लोन करीता अर्ज केला तर यामध्ये तुमचे वय काय आहे? याला खूप महत्त्व असते. म्हणजेच बँक जे तरुण किंवा युवक आहेत व त्यांना स्वतःचा स्वयंरोजगार आहे अशा तरुणांना बँक कर्ज देण्यासाठी पुढे सरसावते. तसेच अशा अर्जदारांना कर्जाची परतफेड करण्याचा कालावधी देखील जास्त मिळतो. यामध्ये अर्जदाराचे वय हे त्याच्या आर्थिक उत्पन्नाची क्षमता किती आहे? याबद्दलचा अंदाज बांधता येऊ शकतो.

2- कागदपत्रे असतात आवश्यक तुम्हाला कुठल्याही कर्जाकरिता अर्ज करताना अगोदर कागदपत्रे द्यावे लागतात व त्याच पद्धतीने होम लोन करता देखील जर अर्ज करायचा असेल तर त्याकरता देखील तुम्हाला बँकेकडे आवश्यक कागदपत्रे देणे गरजेचे असते.

यामध्ये तुम्हाला आयटी रिटर्न, प्रॉफिट आणि लॉस डिटेल्स म्हणजेच नफा आणि तोटा तपशील, बॅलन्स शीट आणि मागील दोन ते तीन वर्षाचे बँक स्टेटमेंट इत्यादी कागदपत्रे सादर करणे गरजेचे असते. या कागदपत्रांच्या आधारे बँकेला तुमच्या ठराविक कालावधीतील व्यवसायाचा परफॉर्मन्स, तसेच तुमच्या व्यवसायातील रोख प्रवाह ट्रेंड इत्यादी गोष्टी समजून घेण्यास मदत होते.

3- उत्पन्न ठरते महत्त्वाचे स्वयंरोजगार असलेल्या व्यक्तीचे निव्वळ उत्पन्न हे होम लोन करिता आवश्यक असलेल्या पात्रतेसाठी खूप महत्त्वाचे असते. निव्वळ उत्पन्न हे व्यवसायासाठी लागणारा खर्च वजा करून जी काही रक्कम उरते त्याला म्हटले जाते.

याव्यतिरिक्त निव्वळ उत्पन्न निश्चित करण्याकरिता आयटी रिटर्न आणि नफा आणि तोटा तपशील यांचे पुनरावलोकन देखील बँकेकडून केले जाते. ही आकडेवारी बँकांकरीता खूप महत्त्वाची असते व यामुळेच बँकांना तुम्ही वेळेवर हप्ते भरू शकाल याची शाश्वती असते.

4- तुमच्या व्यवसायातील सातत्य आणि स्थिरता ठरते महत्वाची बऱ्याच बँका होम लोन मंजूर करण्याअगोदर स्वयंरोजगार असलेल्या अर्जदाराची व्यवसायातील सातत्य कसे आहे व त्याचा परफॉर्मन्स कसा आहे? याबद्दल असलेल्या शक्यता तपासून पाहतात व त्यानुरूप निर्णय घेतात.

5- सिबिल स्कोर ठरतो महत्वाचा या सगळ्या मुद्द्यांमध्ये सिबिल स्कोर खूप महत्त्वाचा ठरतो. बँका होमलोन देण्याअगोदर सध्या अर्जदारावर असलेले कर्ज किंवा इतर कर्ज व त्याचा परतफेडीचा इतिहास कसा आहे इत्यादी बद्दल माहिती सिबिल स्कोरच्या साह्याने तपासतात. चांगला सिबिल स्कोर असेल तर कर्जदार कर्ज परतफेड करण्यासाठी सक्षम आहे हे बँक ठरवत असते. म्हणजेच तुमचा सिबिल स्कोर जितका उत्तम असेल तितक्या सुलभतेने तुम्हाला कर्ज मिळते.

अशा पद्धतीने या गोष्टी जर तुम्ही पूर्ण करत असाल तर तुम्ही नोकरदार नसताना देखील तुम्हाला होम लोन आरामात मिळू शकते.