PNB KYC Update : पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी; 19 मार्चपर्यंत पूर्ण करा ‘हे’ काम; अन्यथा…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PNB KYC Update : पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्ही अजूनही KYC अपडेट केले नसेल तुमच्याकडे आता फक्त काहीच दिवस शिल्लक आहेत. जर तुम्ही बँकेचे हे काम वेळेत पूर्ण केले नाही तर तुम्हाला नुकसानीचा समान करावा लागू शकतो.

बँकेचे हे काम पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे फक्त 19 मार्च 2024 पर्यंतचा वेळ आहे. आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, तुमच्या बँक खात्याचे केवायसी करणे तुमच्यासाठी अनिवार्य आहे. KYC अपडेट करण्याची अंतिम मुदत ही 31 डिसेंबर 2023 पर्यंत होती, नंतर त्यात 19 मार्च 2024 पर्यंत वाढ करण्यात आली.

पंजाब बँकेने ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएस पाठवून केवायसी करण्यास सांगितले आहे. जर बँक ग्राहकांनी असे केले नाही तर तुम्ही 19 मार्च नंतर तुमचे बँक खाते वापरू शकणार नाही. तुम्ही KYC अपडेट न केल्यास तुमचे बँक खाते गोठवले जाऊ शकते.

गेल्या अनेक महिन्यांपासून अनेक बँका ग्राहकांना नो युवर कस्टमर (केवायसी) करण्यासाठी सतर्क करत आहेत. केवायसी अपडेट केल्यानंतर ग्राहकांचे बँक खाते कोणत्याही अडथळ्याशिवाय सक्रिय राहील. सार्वजनिक क्षेत्रातील बँक पंजाब नॅशनल बँक ग्राहकांना लवकर KYC अपडेट करण्यास सांगत आहे. बँकेने ट्विटद्वारे (एक्स) ग्राहकांना केवायसी करून घेण्यास सांगितले आहे.

केवायसी अपडेट आहे का नाही कसे तपासायचे?

तुमच्या पंजाब नॅशनल बँकेचे केवायसी झाले आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला कस्टमर केअरला कॉल करावा लागेल. बँकेने म्हटले आहे की ग्राहक कस्टमर केअर नंबर 18001802222 किंवा 18001032222 वर कॉल करून अधिक माहिती मिळवू शकतात. हे दोन्ही नंबर टोल फ्री आहेत.