Investment Tips: तुमचीही असेल करोडपती व्हायची इच्छा? तर महिन्याला करा 3 हजारांची गुंतवणूक,व्हाल कोट्याधीश

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Investment Tips:- गुंतवणूक हा एक खूप महत्त्वाचा विषय असून भविष्यकालीन आर्थिक समृद्धी किंवा आर्थिक सुरक्षितता असण्याच्या दृष्टिकोनातून चांगल्या ठिकाणी आणि उत्तम परतावा देणाऱ्या योजनांमध्ये गुंतवणूक करणे हे खूप फायद्याचे ठरते. गुंतवणुकीचे अनेक पर्याय सध्या उपलब्ध आहेत.

तसेच बरेच व्यक्ती हे बँकांमध्ये मुदत ठेव योजनांमध्ये गुंतवणूक करतात तर काहीजण म्युच्युअल फंड किंवा शेअर्स बाजारामध्ये गुंतवणूक करतात. परंतु शेअर्स बाजाराचा विचार केला तर बऱ्याचदा शेअर्स बाजारामध्ये जी काही चढ-उतार होत असते त्यामुळे बऱ्याचदा मोठ्या प्रमाणावर गुंतवणूकदारांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता असते. त्याऐवजी जर तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक केली व ती दीर्घ कालावधी करता केली तर गुंतवणुकीतून उत्तम परतावा तुम्हाला मिळण्याची चान्सेस वाढतात.

 सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लानमधील गुंतवणूक आहे फायद्याची

जर तुम्हाला कुठल्याही प्रकारची रिस्क न घेता तुम्हाला जर प्रत्येक महिन्याला ठराविक रक्कम गुंतवायचे असेल तर तुमच्याकडे तर सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन गरज पद्धतशीर गुंतवणूक योजना ही एक खूप उत्तम अशी गुंतवणूक योजना आहे. एसआयपीच्या माध्यमातून केवळ गुंतवणूक  पर्याय उपलब्ध होत नाही तर तो भविष्यासाठी देखील एक नियमित उत्पन्नाचा स्त्रोत बनु शकतो.

तुम्ही जर 25 वर्षाचे असाल व तुमच्या एसआयपी प्लॅन मध्ये तीन हजार रुपये प्रति महिना तुम्ही गुंतवणूक करायला सुरुवात केली तर 35 वर्षांनी जेव्हा तुम्ही रिटायर्ड व्हाल तेव्हा तुमची गुंतवणूक तर वाढेलच परंतु रिटायरमेंट नंतरचे निश्चित उत्पन्न देखील तुम्हाला मिळण्यास मदत होईल.

यामध्ये तुम्ही 25 व्या वर्षी सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान अर्थात एसआयपीमध्ये प्रत्येक महिन्याला तीन हजार रुपयांची गुंतवणूक सुरू केली तर पैसे वाढायला पूर्ण कालावधी किंवा संधी मिळते व यामध्ये केलेल्या तुमच्या गुंतवणुकीमध्ये चक्रवाढ व्याजाचा फायदा होतो.

तुमचे निवृत्तीचे वय जेव्हा जवळ येईल तेव्हा तुम्हाला निश्चित उत्पन्नाचा स्त्रोत देखील तयार होतो व तुम्ही प्रत्येक महिन्याला तीन हजार रुपयांची गुंतवणूक करायला सुरुवात करतात तेव्हा 35 व्या वर्षी पाच टक्के वार्षिक वाढीसह ती पंधरा हजार 760 रुपये मासिक गुंतवणूक होते. याचाच अर्थ असा की गुंतवणुकीच्या पहिल्या वर्षी तुम्ही 36 हजाराची गुंतवणूक करतात तर 35 व्या वर्षी 1.89 लाख रुपये यामध्ये गुंतवणूक करतात.

 35 वर्षांमध्ये व्हाल तुम्ही तीन कोटींचे मालक

त्यामध्ये 12% सरासरी परताव्याच्या आधारावर विचार केला तर 35 वर्षांमध्ये तुम्ही 32.51 लाख यामध्ये गुंतवतात. यांची गुंतवणूक केलेली रक्कम 2.99 कोटी रुपये होते. अशाप्रकारे तुम्ही 35 वर्षांमध्ये तीन कोटी रुपयांचे मालक झालेले असतात. जर तुम्ही सेवानिवृत्ती निधीमध्ये तीन कोटी रुपये ठेवले तर दरवर्षी सहा टक्केच्या फिक्स डिपॉझिट दराने तुम्हाला प्रत्येक महिन्याला  दीड लाख रुपये मिळू शकतात.