LIC देतय कमाईची संधी ! रोज 3 ते 4 तास काम करा, महिन्याला 70 हजार रुपयांपर्यंत होईल कमाई

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

LIC news : सध्या महागाई प्रचंड वाढली आहे. काळाच्या ओघात खर्चही वाढला आहे. त्यामुळे दरमहिन्याला मिळणाऱ्या पगारातून घर चालवणं आता सोपं राहिलं नाही. म्हणूनच आपल्यापैकी अनेकांना वेगवेगळ्या प्रकारची कामे किंवा व्यवसाय करायला आवडतात.

तर, आपल्यापैकी काहींना असे काम करायला आवडते कि ज्यात कसलेली पैशांची गुंतवणूक नसेल पण पैसे मात्र मिळत राहतील. तुम्हीही या लोकांपैकी एक असाल तर एलआयसी तुम्हाला अशी संधी देऊ शकते.

होय, एलआयसी म्हणजेच भारतीय विमा निगम लोकांना चांगले उत्पन्न मिळविण्याची संधी देत आहे. भारतातील सर्वात मोठी गुंतवणूकदार असणाऱ्या एलआयसीमध्ये सामील होऊन तुम्ही दरमहा 70 हजार रुपये कमवू शकता. चला तर मग याबद्दल सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत –

LIC एजन्ट

एलआयसी एजंट बनून तुम्ही चांगले उत्पन्न मिळवू शकता. या कंपनीत तुम्ही पूर्णवेळ किंवा अर्धवेळ काम करू शकता. तुम्ही जितका जास्त वेळ द्याल तेवढा जास्त इन्कम तुम्ही कमावू शकता. यात वेळेला आणि कमाईला मर्यादा नसते.

एलआयसी एजंट होण्यासाठी काय आवश्यक ?

एलआयसी एजंटांसाठी कोणतीही स्पेशालिटी असण्याची गरज नाही. मात्र, जर तुम्ही चांगले बोलू शकत असाल आणि एखाद्याला पटवून देण्यात पारंगत असाल तर तुम्ही नक्कीच जास्त पैसे कमवू शकता. एलआयसी एजंटला पॉलिसीवर कमिशन दिले जाते. आपण अधिक कमिशनसह अधिक कमाई करू शकता. सर्व पॉलिसींवर वेगवेगळे कमिशन दिले जाते.

3 ते 4 तास काम करून दरमहा 70 हजार रुपये कमाई

तुम्ही एलआयसीसाठी दररोज 3 ते 4 तास काम करत असाल तर तुमची कमाई नक्कीच जास्त होईल. तुम्ही जितक्या जास्त पॉलिसी विकाल तितका जास्त फायदा तुम्हाला मिळेल. दररोज किमान 4 तास काम करून तुम्ही एका महिन्यात 70 हजार रुपये कमवू शकता.

एलआयसी एजंटसाठी पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे

आपण एलआयसी कंपनीत जाऊन एजंटसाठी अर्ज करू शकता. मात्र, त्यासाठी दहावी किंवा बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यासाठी सर्वप्रथम तुमच्यासाठी एक टेस्ट घेतली जाईल, ती पास झाल्यानंतर तुम्हाला एजंट बनता येईल.

मतदार ओळखपत्र, दहावीची गुणपत्रिका, 6 पासपोर्ट साइज फोटो, आधार कार्ड, पॅनकार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्सची छायाप्रत आदी आवश्यक कागदपत्रे तुम्हाला लागतील.

विश्वासार्ह कंपनी

एलआयसी ही एक विश्वासार्ह कंपनी आहे. यामध्ये केली गेलेली गुंतवणूक ही सुरक्षित असते. इतर पर्यायांपेक्षा गुंतवणुकीसाठी एलआयसी पॉलिसी तुम्ही निवडलीत तर नक्कीच तुम्हाला जास्त फायदा व सुरक्षित फायदा मिळेल यात शंका नाही.