Maharashtra Budget 2022 : शिक्षण विभागासाठी महत्वाचा निर्णय; तब्बल ‘एवढ्या’ कोटींची तरतूद

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुंबई : महाविकास आघाडी सरकारकडून (Mahavikas Aghadi government) राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2022) सादर होत आहे.

राज्याचे अर्थमंत्री (Minister of Finance) अजित पवार (Ajit Pawar) विधानसभेत अर्थसंकल्प सादर करत असताना आरोग्य व शिक्षण (Teaching) यासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे.

यामध्ये शालेय शिक्षण विभागासाठी २ हजार ३५४ कोटी रुपयांची तरूतूद करण्यात आली आहे. शाळांच्या सोयी सुविधांसाठी जिल्हा स्तरावर ५ टक्के निधी व शिष्यवृत्ती, फेलोशिप याद्वारे सर्व विभागांच्या योजना लाभार्थ्यांच्या आधार कार्डशी (Aadhar card) जोडणार आहेत.

याशिवाय, संदेशवहन उपग्रहण, ड्रोन टेक्नॉलॉजी (Drone technology) जागतिक तंत्रज्ञानाच्या युगात युवकांना संधी मिळावी म्हणून इनोव्हेशन हब सुरु करण्यात येणार प्रत्येक विभागात स्थापना होणार आहे. तसेच शिवाजी विद्यापीठातील केंद्रासाठी १० कोटी आणि मुंबईच्या रत्नागिरीतील उपकेंद्रासाठी २ कोटी रुपये देण्यात येणार असल्याचे अजित पवार म्हणाले.

यासोबतच वैद्यकीय शिक्षण संस्थांमध्ये जागा वाढवणार आहेत. देशातल्या तरुणांना इथेच वैद्यकीय शिक्षणाची संधी मिळावी म्हणून पदव्युत्तर शिक्षण संस्थांमध्ये जागा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबईतील सेंट जॉर्ज, नाशिकमधील आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नागपूरमधील बाबासाहेब आंबेडकर शिक्षण संस्था स्थापन करण्यात येणार आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमात आधुनिक तंत्रात फिजिओथेरपी तंत्राचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशीही माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी यांनी अर्थसंकल्पात दिली आहे.