Post Office : पोस्ट ऑफिसची कमाल! व्याजातूनच कराल लाखोंची कमाई, जाणून घ्या काय आहे स्कीम!

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Post Office : सध्या पोस्ट ऑफिस आपल्या ग्राहकांना एका पेक्षा एक योजना ऑफर करते, ज्यांतर्गत गुंतवणूक करून तुम्ही उत्तम परतावा कमवू शकता. आज आपण पोस्टाच्या अशाच एका योजनेबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यातून तुम्ही बक्कळ कमाई करून पुढील आयुष्य निवांत जगू शकता.

गेल्या वर्षी १ मार्च रोजी सरकारने पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट स्कीमवरील व्याजदर ७ टक्क्यांवरून ७.५ टक्के केला होता. अशास्थितीत तुम्ही या योजनेवर पूर्वीपेक्षा जास्त परतावा मिळवू शकता.

पोस्ट ऑफिसमध्ये लहान मुले आणि वृद्धांसाठी अनेक बचत योजना चालवल्या जात आहेत. यापैकी ही एक विशेष योजना गुंतवणूकदारांना केवळ व्याजाद्वारेच लाखो रुपये कमावण्यास मदत करते. तसेच पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट स्कीममध्ये तुमचे पैसे अगदी सुरक्षित राहतात.

आज प्रत्येकाला त्यांच्या कमाईचा काही भाग वाचवायचा असतो आणि तो अशा ठिकाणी गुंतवायचा असतो जिथे त्यांचे पैसे सुरक्षित असतील आणि त्यांना त्यावर उत्तम परतावा देखील मिळू शकेल. अशा परिस्थितीत, पोस्ट ऑफिसद्वारे चालवल्या जाणाऱ्या छोट्या बचत योजना आता बऱ्यापैकी लोकप्रिय ठरत आहेत. पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट स्कीम देखील त्यामधलीच एक आहे.

तुमच्या माहितीसाठी लहान बचत योजनांचे व्याजदर सरकार दर तीन महिन्यांनी सुधारित करतात. दरम्यान, आता पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिटवरील व्याजदर देखील 7 टक्क्यांवरून 7.5 टक्के करण्यात आले आहेत. या व्याजदरासह ही पोस्ट ऑफिस योजना सर्वोत्तम बचत योजनांपैकी एक आहे.