Investment Tips : मुलांच्या शिक्षणाची चिंता सतावत आहे का?; ‘अशी’ करा गुंतवणूक…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Investment Tips : सध्या महागाई झपाट्याने वाढत आहे, असे असूनही लोकांचे उत्पन्न मात्र त्या प्रमाणात वाढत नाही. अशा परिस्थितीत भविष्यात मोठ्या खर्चाला सामोरे जाण्यासाठी लोक आधीच आर्थिक नियोजन करत असतात. अशातच पालकांनी मुलांच्या भविष्याची चिंता करणे रास्त आहे. तुम्हालाही तुमच्या मुलांचे भविष्य सुरक्षित करायचे असेल, तर त्यांच्यासाठी आतापासूनच आर्थिक नियोजन करणे फार महत्वाचे आहे.

तुमच्या मुलांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी तुम्ही SIP मध्ये गुंतवणूक करून भविष्यात मोठा निधी जमा करू शकता. SIP द्वारे तुम्ही दर महिन्याला छोटीशी गुंतवणूक केली तर मुलं मोठी होईपर्यंत त्यात लाखोंचा निधी तयार होईल. याच्या मदतीने तुम्हाला मुलांचे शिक्षण, लग्न यासारख्या मोठ्या खर्चासाठी खूप मदत मिळू शकते.

किती गुंतवणूक करावी लागेल?

मुलांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी, तुम्ही तुमच्या उत्पन्न आणि बचतीनुसार दरमहा SIP मध्ये ठराविक रक्कम गुंतवू शकता. जर तुम्ही दर महिन्याला 5,000 रुपयांची गुंतवणूक करायला सुरुवात केली, तर तुमचे मूल 20 वर्षांचे होईपर्यंत त्याच्यासाठी तुम्ही 50 लाख रुपयांपर्यंतचा निधी सहज तयार करू शकता. तज्ज्ञांच्या मते, एसआयपीत तुम्हाला चक्रवाढ व्याजाचा लाभ मिळाल्याने दीर्घ मुदतीत चांगला परतावा मिळू शकतो. यामध्ये साधारणपणे 12 टक्के रिटर्न्स मिळतात.

जर तुम्ही मुलाच्या जन्मासोबत दर महिन्याला 5,000 रुपयांची एसआयपी सुरू केली आणि ती पुढील 20 वर्षे सुरू ठेवली, तर अशा प्रकारे तुम्ही एकूण 12 लाख रुपयांची गुंतवणूक कराल. जर तुम्हाला यावर किमान 12% परतावा मिळाला तर 20 वर्षात तुम्हाला एकूण 37,95,740 रुपये व्याज मिळेल. दुसरीकडे, जर तुम्ही दोन्ही एकत्र पाहिल्यास, तुमच्याकडे मुलांसाठी एकूण 49,95,740 रुपयांचा फंड तयार असेल.

गुंतवणूक जास्त, परतावा जास्त

तुम्ही ही गुंतवणूक 20 वर्षांच्या ऐवजी 25 वर्षे चालू ठेवल्यास, योजना पूर्ण झाल्यावर तुम्हाला एकूण 94,88,175 रुपयांचा निधी मिळेल. अशा प्रकारे, तुम्ही एवढा मोठा निधी सहज तयार करू शकता जो तुम्हाला इतर कोणत्याही योजनेतून मिळू शकत नाही. येथे आम्ही SIP वर सरासरी परतावा मोजला आहे. कधी-कधी तुम्हाला यापेक्षाही जास्त परतावा मिळू शकतो. लक्षात घ्या तुम्ही जेवढी वर्षे गुंतवणूक वाढवाल तेवढा जास्त परतावा तुम्हाला मिळेल.