Post Office Scheme : पोस्ट ऑफिसची पैसा वसुल योजना; मिळत आहे दुप्पट परतावा; बघा…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Post Office Scheme : पोस्ट ऑफिसकडून अनेक योजना ऑफर केल्या जातात. यामध्ये गुंतवणूकदारांना सुरक्षिततेसह उत्कृष्ट परतावा देखील मिळतो. सध्या पोस्ट ऑफिसच्या अल्पबचत योजनेतील व्याजदरात सरकारने वाढ केली आहे. ज्याअंतर्गत गुंतवणूकदारांना उत्तम परतावा मिळतो.

पोस्टाची अशीच एक योजना म्हणजे किसान विकास पत्र योजना, जी खासकरून शेतकऱ्यांसाठी राबविण्यात आली आहे. केंद्र सरकारने या योजनेवरील व्याजदर वार्षिक ७.२ टक्क्यांवरून ७.५ टक्के केला आहे. म्हणजेच या योजनेत गुंतवणूक करून तुमचे पैसे काही दिवसातच दुप्पट होतील. चला या योजनेबद्दल सविस्तर जाणून घेऊया…

किसान विकास पत्र योजना काय आहे?

KVP योजना भारत सरकार चालवत आहे. या योजनेत तुम्ही निश्चित वेळेत तुमचे पैसे दुप्पट करू शकता. या योजनेत किमान 1000 रुपयांची गुंतवणूक आवश्यक आहे. येथे जास्तीत जास्त गुंतवणुकीवर मर्यादा नाही.

पैसे दुप्पट होण्यासाठी किती वेळ लागतो?

KVP योजनेत गुंतवणूक करून तुम्हाला ७.५ टक्के दराने व्याज मिळू शकते. या योजनेत पैसे 115 महिन्यांत म्हणजे 9 वर्षे आणि 7 महिन्यांत दुप्पट होतात. म्हणजेच तुम्ही 4 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला 115 महिन्यांत 8 लाख रुपये मिळतील. यासोबतच व्याजावर व्याजही मिळते.

या योजनेत तुम्ही 100 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. यामध्ये एकल आणि संयुक्त खाते उघडता येते. यामध्ये नॉमिनी सुविधा देखील उपलब्ध आहे. 10 वर्षांपेक्षा जास्त वयाची मुले त्यांच्या स्वतःच्या नावाने KVP खाते उघडू शकतात.