Post Office Scheme : सुपरहिट योजना ! एका गुंतवणुकीवर दरमहा मिळतील 3,083 रुपये, पहा योजना

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Post Office Scheme : प्रत्येकजण गुंतवणूक करण्याचा विचार करत असतो. तसेच अनेकजण आजही मोठी गुंतवणूक करत आहेत. मात्र गुंतवणूक कुठे करायची हे अनेकांना माहिती नसते. मात्र सरकारच्या अशा काही योजना आहेत ज्या ठिकाणी तुम्ही गुंतवणूक करून चांगला फायदा मिळवू शकता.

तुम्हालाही विना जोखीम गुंतवणूक करायची असेल तर तुमच्यासाठी पोस्ट ऑफिसच्या उत्तम योजना उपलब्ध आहेत. या योजनांमध्ये तुम्ही गुंतवणूक करून चांगला नफा मिळवू शकता. या योजनांमधून तुम्हाला खात्रीशीर नफा मिळेल.

पोस्ट ऑफिसकडून छोट्या गुंतवणूकदारांसाठी स्मॉल सेव्हिंग्ज स्कीम सादर केल्या आहेत. या योजनांमध्ये गुंतवणूकदार एकदाच गुंतवणूक करून दरमहा चांगले व्याज मिळवू शकतात. पोस्ट ऑफिसची मासिक उत्पन्न योजना POMIS मध्ये तुम्ही बिनधास्त गुंतवणूक करू शकता.

POMIS योजनेमध्ये तुम्हाला एकदाच गुंतवणूक करावी लागते. खाते उघडल्यापासून पुढील 5 वर्षासाठी त्याची मॅच्युरिटी असते. 1 ऑक्टोबर 2023 पासून 7.4 टक्के वार्षिक व्याज या योजेनवर दिले जात आहे.

POMIS मासिक उत्पन्न कसे ठरवले जाते?

पोस्ट ऑफिसच्या या योजनेत तुम्ही एकल खात्यात 9 लाख रुपये आणि संयुक्त खात्यात 15 लाख रुपये जमा करू शकता. तुम्हाला तुमची मूळ रक्कम 5 वर्षांच्या मॅच्युरिटी कालावधीनंतर परत केली जाईल. जर तुम्हाला आणखी या योजनेचा कालावधी वाढवायचा असेल तर तुम्ही 5 वर्षांनी वाढवू शकता. या योजनेचे व्याज दरमहा तुमच्या खात्यावर जमा केले जाते.

5 लाखांच्या ठेवींवर किती दरमहा किती व्याज मिळेल

जर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या या योजनेत 5 लाख रुपये जमा केले असतील तर वार्षिक 7.4 टक्के व्याज दरमहा तुम्हाला दिले जाईल. दरमहा तुम्हाला 3,083 रुपये व्याज म्हणून दिले जातील. 12 महिन्यात हे 36,996 रुपये होईल.

पोस्ट ऑफिसच्या या योजनेचा कालावधी 5 वर्षांनी पूर्ण होतो. तुम्ही या योजनेत पैसे गुंतवणूक केल्यावर एका वर्षांनी पैसे काढू शकता. एक वर्ष ते तीन वर्षांच्या दरम्यान पैसे काढल्यास, ठेव रकमेपैकी 2% रक्कम कपात केली जाते. ३ वर्षांच्या मुदतीपूर्वी पैसे काढल्यास तुमच्या ठेवीपैकी १% रक्कम कापली जाते.