Post Office Scheme: ‘या’ योजनेने गुंतवणूकदारांना लावला वेड ! 2 दिवसांत उघडली लाखो खाती ; होत आहे पैसे दुप्पट

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Post Office Scheme: तुम्ही देखील येणाऱ्या काळात तुमच्या भविष्याचा विचार करून  बचत योजनेमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी कामाची ठरणार आहे. आम्ही तुम्हाला या लेखात आज एका जबरदस्त योजनेबद्दल माहिती देणार आहोत ज्याचा फायदा घेऊन तुम्ही लाखो रुपये कमवू शकतात.

तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या कि तुम्हाला या योजनेत पैसे देखील दुप्पट करण्याची संधी मिळत आहे. तुम्हाला हे माहिती असेल कि आज भारत सरकार पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून अनेक योजना राबवते. या योजनांच्या माध्यमातून देशातील अनेकांना आज लाखो रुपयांचा फायदा देखील होत आहे. यातील एका योजनेला नागरिकांनी खूप पसंती दिली दिली आहे.

आम्ही तुम्हाला सांगतो या योजनेमध्ये 2 दिवसात 10 लाख खाती उघडण्यात आली आहे. याबाबतची माहिती केंद्रीय रेल्वे, दळणवळण, इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विट करून दिली आहे. ज्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही भारतीय पोस्टचे अभिनंदन केले आहे. या विशेष योजनेचे नाव “सुकन्या समृद्धी योजना” आहे .

2 दिवसात 10 लाख खाती उघडली

आकडेवारीनुसार संपूर्ण देशात या योजनेसाठी दरवर्षी सरासरी 33 लाख खाती उघडली जातात. 1 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी या काळात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आणि अमृत कालच्या प्रारंभाच्या निमित्ताने देशभरातील टपाल कार्यालयांकडून सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत खाती उघडण्याची मोहीम राबविण्यात आली असून, त्यात 7.5 लाख खाती उघडण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. केवळ 9 आणि 10 फेब्रुवारीला 10,90,000 खाती लोकांनी उघडली आहेत.

ही योजना तुम्हाला करोडपती बनवेल

सुकन्या समृद्धी योजना विशेषत: मुलींसाठी भारत सरकारद्वारे चालवली जाते. ज्यासाठी 10 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुलींचे खाते योजनेअंतर्गत उघडता येईल. पालक आपल्या मुलींच्या नावे खाते उघडू शकतात. या अंतर्गत 7.6 टक्के व्याज मिळते. यासोबतच आयकर सवलतीची सुविधाही उपलब्ध आहे. जर तुम्ही दरमहा 3000 रुपये खात्यात गुंतवले तर मॅच्युरिटीनंतर तुम्हाला 16 लाख रुपये मिळतील.

post-office-rd-fe_202102563098

(अस्वीकरण: या लेखाचा उद्देश फक्त माहिती शेअर करणे आहे. आम्ही कोणत्याही योजनेत गुंतवणूक करण्याची शिफारस करत नाही. तज्ञांचा सल्ला घ्या.)

हे पण वाचा :- IMD Alert Today: अरे देवा ! 12 राज्यांमध्ये पुन्हा धो धो पाऊस तर ‘या’ राज्यात बर्फवृष्टी; जाणून घ्या ताजे अपडेट्स