RBI Rule: तुम्हीही होमलोन घेतले आहे का? 1 डिसेंबर पासून लागू होत असलेला हा नियम तुम्हाला माहिती असणे आहे गरजेचे!वाचा माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

RBI Rule:- जीवनामध्ये आपण अनेक प्रकारच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या एनबीएफसी किंवा वित्तीय संस्था आणि बँकांकडून कर्ज घेत असतो. बँकांच्या व्यवहारांमध्ये बँकांकडून ज्या काही आर्थिक सुविधा किंवा कर्ज सुविधा पुरवल्या जातात  या सगळ्या सुविधा या रिझर्व बँक ऑफ इंडियाने घालून दिलेल्या नियमानुसार दिल्या जातात. व्यक्ती बँकांकडून अनेक कारणांसाठी कर्ज घेत असते.

या दृष्टिकोनातून रिझर्व बँक ऑफ इंडिया ग्राहकांच्या व बँकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून अनेक प्रकारचे नियम बनवत असते व या नियमानुसार सगळे व्यवहार किंवा सगळी कार्यपद्धती चालत असते. याच कर्जामध्ये जर गृह कर्ज घेणाऱ्यांची संख्या मोठी असते व अशा गृहकर्ज म्हणजेच होमलोन घेतलेल्यांसाठी आता  रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण नियम  लागू करण्यात येणार असून त्याची अंमलबजावणी एक डिसेंबर पासून होणार आहे.

 1 डिसेंबर पासून प्रॉपर्टीशी संबंधित नवा नियम लागू

रिझर्व बँक ऑफ इंडिया च्या माध्यमातून 1 डिसेंबरपासून प्रॉपर्टीशी संबंधित एक नवा नियम लागू करण्यात येणार असून यानुसार आता प्रॉपर्टीवर कोणत्याही प्रकारचे कर्ज घेतले असेल तर ते कर्ज पूर्ण फेडल्यानंतर तीस दिवसांच्या आत प्रॉपर्टीचे बँकेकडे असलेले कागदपत्र ग्राहकांना परत करणे गरजेचे आहे. जर बँकेकडून ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली नाही तर बँकांना प्रत्येक दिवसाला पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे.

याबाबतीत बऱ्याचदा आपल्याला दिसून येते की लोन संपूर्णपणे रिपेमेंट केल्यानंतर देखील ग्राहकांना कागदपत्रांकरिता बँकांकडे चकरा माराव्या लागतात. कधीकधी तर बँकांकडून अशी प्रॉपर्टीची कागदपत्रे गहाळ झाल्याचे देखील सांगण्यात आलं आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो.

बँकांचा हा बेजबाबदारपणा आणि ग्राहकांनी यासंबंधी केलेल्या वारंवार तक्रारी  या अनुषंगाने आता रिझर्व बँकेकडून हा नियम लागू करण्याचा निर्णय करण्यात आला आहे. आता ग्राहकाकडून पूर्णपणे कर्जाचे परतफेड झाल्यानंतर बँकेकडून संबंधित प्रॉपर्टीच्या कागदपत्रांची मूळ प्रत संबंधित व्यक्तीला परत करणे अपेक्षित असतं.

परंतु बऱ्याचदा बँका याबाबतीत बेजबाबदारपणाची भूमिका निभवतांना दिसतात आणि सगळे परिस्थिती नियंत्रणात रहावी म्हणून हा नियम आता जारी केला गेला आहे. त्यामध्ये आता बँक असो किंवा एनबीएफसी यांना स्पष्टपणे सूचना करण्यात आल्या आहेत की कर्जाच्या परतफेड नंतर तीस दिवसांच्या आत कागदपत्र परत करावी.

जर असे केले नाही तर म्हणजेच कागदपत्र परत करण्याच्या कालावधीला जर उशीर झाला तर बँका किंवा एनबीएफसी च्या कडून दर दिवशी 5000 रुपयांच्या हिशोबाने दंड सुनावला जाईल. इतकेच नाही तर ही दंडाची रक्कम बँकेकडून संबंधित प्रॉपर्टीच्या मालकाला देण्यात येईल. बँकेकडून एखादा प्रॉपर्टी चे कागदपत्र गहाळ झाले असतील तर ती पुन्हा मिळवून देण्यामध्ये बँकेनेच मदत करावी अशा देखील सूचना देण्यात आल्या आहेत.