SBI Bank : पॅन कार्ड लिंक न केल्यास खाते होईल बंद?, SBI बँकेकडून मोठे अपडेट !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SBI Bank : तुम्हीही SBI बँकेचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की, जर तुम्ही तुमचे खाते पॅन कार्डशी लिंक केले नाही तर तुमचे खाते बंद केले जाऊ शकते. जर तुम्हालाही असा मेसेज आला असेल तर त्यावर विश्वास ठेवण्यापूर्वी त्या मेसेजची सत्यता जाणून घ्या. या प्रकरणाची माहिती देताना अतिशय गंभीर खुलासा झाला आहे.

या प्रकरणी प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. यामध्ये सांगितले गेले आहे की, गेल्या काही दिवसांपासून फसवणूक करणारे स्टेट बँकेच्या नावाने लोकांना असा संदेश पाठवत आहेत, ‘तुम्ही तुमच्या खात्याशी पॅन क्रमांक अपडेट केले नसल्यास तुमचे खाते ब्लॉक केले जाईल.’

यासोबतच तुम्हाला कॉल किंवा कोणत्याही लिंकद्वारे पॅन माहिती अपडेट करण्याचा सल्ला दिला जात आहे. तरी दिलेल्या माहिती नुसार, ग्राहकांना असा काही मेसेज आला तर चुकूनही विश्वास ठेवू नका. हा संदेश पूर्णपणे खोटा असल्याचे सांगितले आहे.

स्टेट बँक आपल्या ग्राहकांना वेळोवेळी अशा फसवणुकीपासून सावध करत असते, बँक कोणालाही कॉल किंवा मेसेज करून त्यांच्या खात्याशी संबंधित माहिती अपडेट करण्याचा सल्ला देत नाही. बँक पॅन तपशील अपडेट करण्यास सांगणारी कोणतीही लिंक पाठवत नाही. यासोबतच, बँकेने असेही सांगितले आहे की, जर कोणी सायबर गुन्ह्याचा बळी ठरला तर अशा परिस्थितीत तो सायबर क्राईम सेलमध्ये 1930 या क्रमांकावर किंवा रिपोर्ट phishing@sbi.co.in या ईमेलद्वारे तक्रार करू शकतो.