‘या’ गाईचा नाद कशाला! ही गाय दिवसाला देते चक्क 80 लिटर दूध, वाचा या गाईचे वैशिष्ट्य

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर शेती सोबत शेतकरी पशुपालन हा व्यवसाय करत असतात. दुधाचे उत्पादनाच्या दृष्टिकोनातून पशुपालन व्यवसायाला अनन्यसाधारण महत्त्व असून या पशुपालन व्यवसायाच्या माध्यमातून दूध उत्पादन या शेतकऱ्यांचा प्रमुख आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत असतो.

यामध्ये म्हशी आणि गाईंचे पालन प्रामुख्याने दूध उत्पादनासाठी केले जाते. यामध्ये वेगवेगळ्या प्रजातींच्या म्हशी आणि गाईंचा समावेश होतो. खास करून जर आपण गाईंचा विचार केला तर यामध्ये अनेक देशी आणि संकरित प्रजाती असून देशी प्रजातींमध्ये गिर आणि साहिवाल सारख्या गाई या दूध उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेतच

तर संकरित गायींमध्ये जर्सी आणि होलस्टीन फ्रीजियन सारख्या गाई खूप महत्त्वाचे आहे. कारण पशुपालनामध्ये जर तुम्हाला दूध उत्पादनाच्या माध्यमातून जास्तीचा पैसे किंवा जास्तीचा नफा मिळवायचा असेल तर मात्र जास्त दूध देणाऱ्या गाई किंवा म्हशींची निवड खूप महत्त्वाचे असते.

त्यामुळे प्रत्येक पशुपालकाचा कल हा जास्तीत जास्त दूध देणाऱ्या प्रजातींचे पालन करण्याकडे आपल्याला दिसून येतो. या मुद्द्याच्या अनुषंगाने आपण एक गाय अशी पाहणार आहोत जी दिवसाला 80 लिटर दूध देते. कदाचित हे वाचून आपला विश्वास बसणार नाही. परंतु हे सत्य आहे. कारण अशा पद्धतीची दूध देणारी गाय हरियाणा मध्ये झालेल्या एका पशु मेळाव्यामध्ये ठेवण्यात आलेली होती व या गाईबद्दल आपण माहिती बघणार आहोत.

 या गाईचे नाव आहेशकिरा

हरियाणा मध्ये झालेल्या पशु मेळाव्यामध्ये येथील शेतकरी सुनील आणि शैकी या दोन भावांनी ही गाय प्रदर्शनामध्ये आणलेली होती व या गाईचे नाव शकीरा असे आहे. विशेष म्हणजे या प्रदर्शनामध्ये या गाईने तब्बल 80 लिटर 756 मिलिग्रॅम दूध देण्याचा विक्रम स्वतःच्या नावे केला.

विशेष म्हणजे शकिराच्या आधी आशिया खंडामध्ये सर्वात जास्त दूध देणाऱ्या गाईचा विक्रम होता व तो 72 लिटरचा होता. परंतु शकिराने हा विक्रम मोडीत काढत नवीन विक्रम प्रस्थापित केला. त्यामुळे शकिराला आता जास्त दूध देणाऱ्या गाईंच्या पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आली.

हे दोन्ही भाऊ हरियाणा राज्यातील झंझाडी या गावचे रहिवासी आहेत व ते गेल्या बारा वर्षापासून  दूध व्यवसायात आहे. त्यांच्याकडे सध्या 100 पेक्षा जास्त इतर जनावरे आणि गाई असून त्यांचा हा वडिलोपार्जित व्यवसाय आहे व गेल्या बारा वर्षापासून ते या माध्यमातून चांगला पैसा मिळवत आहेत.

शेतीसोबत या दोन्ही भावांनी पशुपालन व्यवसायाचा देखील मोठा विकास केला असून त्याकरिता एक मोठी शेड उभारले असून यामध्ये शकिरा गाईचे पालन केले जाते. शकिरा गाईचे सध्या वय सहा वर्ष असून ती होलस्टीन फ्रीजियन या जातीची गाय आहे.  विशेष म्हणजे शकिरा 24 तासांमध्ये तीन वेळा दूध देते.