तुमच्या पॅन कार्डचा वापर इतर कोणी कर्जासाठी केला आहे का? ही पद्धत वापरा व पटकन तपासा! आर्थिक फसवणुकीपासून वाचा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सध्याचे युग तंत्रज्ञानाचे आणि इंटरनेटचे युग आहे व त्यामुळे व्यक्तीचे आयुष्य हे जलद आणि सुलभ देखील झालेले आहे. तंत्रज्ञानामुळे अनेक अवघड कामे आता चुटकीसरशी पूर्ण करता येणे नागरिकांना शक्य झालेले आहेत. परंतु एखाद्या चांगल्या गोष्टीची वाईट बाजू देखील असते अगदीच याप्रमाणे या तंत्रज्ञानाच्या मदतीने अनेक सायबर फसवणुकीचे प्रकरणे देखील दिवसेंदिवस समोर येत आहेत.

सायबर भामटे हे लोकांची बँक खाते रिकामी करण्यापासून तर अनेक पद्धतीने सायबर फसवणूक करताना आपल्याला दिसून येत आहेत व यामध्ये दररोज वेगवेगळ्या पद्धती अवलंबताना देखील दिसत आहेत. बऱ्याचदा कुठल्यातरी लिंक पाठवल्या जातात व त्यावर क्लिक केले तरी व्यक्तीचे बँक खाते मिनिटात रिकामे होते अशा प्रकारच्या फसवणुकीच्या घटना देखील दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे.

तसेच तुमचे पॅन कार्ड सारखा कागदपत्राचा वापर करून देखील एखाद्या बँकेकडून तुमच्या नावाने कर्ज घेतले जाण्याची देखील दाट शक्यता या सायबर भामट्यांच्या माध्यमातून नाकारता येत नाही. अशा पद्धतीने जर एखाद्या व्यक्तीने तुमच्या पॅन  कार्डवर कर्ज घेतले असेल व त्या व्यक्तीने ते कर्जाची परतफेड केली नसेल तर तुम्हाला जेव्हा बँकेकडून नोटीस मिळते तेव्हा तुम्हाला कळते की तुमच्या नावावर कोणीतरी दुसऱ्या व्यक्तीनेच कर्ज घेतलेले आहे.

त्यानंतर खूपच मनस्ताप होतो व कोर्टाच्या फेऱ्या देखील माराव्या लागू शकतात. त्यामुळे तुमच्या पॅन कार्डचा गैरवापर होऊ नये किंवा तुमच्या पॅन कार्ड वर अगोदर कोणी कर्ज घेतलेले आहे का हे तुम्ही तुमच्या सिबिल स्कोरवरून जाणून घेऊ शकतात.

 सिबिल स्कोर माहिती करा

सिबिल स्कोर तपासून तुम्ही तुमच्या नावाने इतर कोणत्याही व्यक्तीने तुमचे पॅन कार्ड वापरून कर्ज घेतले आहे की नाही हे आरामात माहिती करू शकतात. कारण क्रेडिट रिपोर्टमध्ये व्यक्तीने कुठे आणि किती कर्ज घेतले आहे याची पूर्ण माहिती असते. एवढेच नाही तर यामध्ये तुमचे नाव,तूमची जन्मतारीख तसेच पत्ता, फोन नंबर, नोकरी, कर्ज,क्रेडिट कार्ड अर्ज इत्यादी सगळी माहिती तुम्हाला या क्रेडिट रिपोर्टमध्ये मिळते.

 अशाप्रकारे तपासा तुमच्या पॅन कार्डवर कोणी कर्ज घेतले आहे की नाही?

1- सिबिल स्कोरच्या माध्यमातून तुमच्या पॅन कार्डवर कोणी कर्ज घेतले आहे की नाही याबाबत माहिती तुम्हाला मिळू शकते व याकरिता तुम्हाला CIBIL च्या अधिकृत वेबसाईट cibil.com वर जावे.

2- या ठिकाणी गेल्यानंतर जे पेज ओपन होईल त्या पेजवर थोडे खाली गेलात की तुम्हाला फ्री सिबिल स्कोर आणि रिपोर्ट असे लिहिलेले दिसेल. तिथे अगदी खाली लिहिलेल्या गेट स्टार्टेड नाऊ वर क्लिक करा.

3- त्यानंतर एक पेज ओपन होईल व त्या ठिकाणी तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती भरावी लागेल व या माहितीमध्ये तुमचा ईमेल, पत्ता, नाव, आयडी( पॅन नंबर ), जन्मतारीख, मोबाईल नंबर इत्यादी माहिती भरा आणि त्यानंतर खाली बॉक्समध्ये लिहिलेल्या स्वीकारा आणि सुरू ठेवा वर क्लिक करा.

4- त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल व तो आलेला ओटीपी दिलेल्या जागेत नमूद करा व खाली बॉक्समध्ये दिलेल्या कंटिन्यू वर क्लिक करा. या पद्धतीने आणखी थोडी काही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुमची नोंदणी पूर्ण केली जाते.

6- त्यानंतर तुमचा सिबिल स्कोर आणि क्रेडिट रिपोर्ट तुमच्यासमोर येतो. त्यामध्ये तुम्ही तुमचा क्रेडिट रिपोर्ट तपासा आणि त्यात तुम्ही घेतलेले क्रेडिट कार्ड आणि इतर कर्जाबद्दल संपूर्ण माहिती योग्य आहे का ते पहा.  यामध्ये जर तुम्ही न घेतलेल्या कर्जाबद्दल काही माहिती दिसत असेल तर त्वरित सावधान व्हा.

 या ठिकाणी करा

या पद्धतीने जर तुम्हाला तुमच्या पॅनवर एखाद्याने कर्ज घेतल्याचे तुम्हाला समजले तर सर्वप्रथम त्या बँकेकडे तक्रार करा जिथून ते कर्ज घेतले गेले आहे. याशिवाय तुम्ही प्राप्तिकर विभागाच्या अधिकृत वेबसाईट  eportal.incometax.gov.in वर जाऊन तक्रार नोंदवा.