उद्योग आधारमुळे व्यवसायाकरिता मिळू शकते 10 कोटी रुपयांपर्यंत ताबडतोब कर्ज! काय आहे नेमके उद्योग आधार? वाचा माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

तुम्ही एखादा छोटा व्यवसाय जरी सुरू करायचे ठरवले तरी त्याकरिता तुम्हाला पैशांची आवश्यकता भासते. तसेच असलेला व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी देखील तुम्हाला पैसा लागतो. परंतु बऱ्याचदा तुमच्याकडे पैसा नसेल तर मात्र व्यवसायाचा विस्तार करण्यास अडचणी निर्माण होतात किंवा व्यवसाय सुरूच करता येत नाही.

याकरिता व्यक्ती अनेक पद्धतीचे पर्याय करून पाहतो व कर्ज स्वरूपात पैसे उभारण्याचा प्रयत्न करतो. याकरिता केंद्र सरकारच्या माध्यमातून अशा व्यावसायिक लोकांकरिता आधार कार्ड जारी करण्यात येते व यालाच उद्योग आधार असे म्हटले जाते. महत्वाचे म्हणजे याकरिता तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी 25 लाख ते दहा कोटी रुपयांपर्यंत कर्ज देखील घेता येणे शक्य होते.

 उद्योग आधार नेमके काय आहे?

आपले जे काही आधार कार्ड असते त्यापेक्षा हे उद्योग आधार थोडेसे वेगळे असते. ज्या कंपन्यांचा समावेश मायक्रो, स्मॉल किंवा मिडीयम इंटरप्राईजेस अर्थात एमएसएमई या श्रेणीमध्ये येतात ते उद्योग या अंतर्गत नोंदणी करू शकता. उद्योग आधारमध्ये नोंदणी केल्यानंतर एक बारा अंकी क्रमांक असलेले प्रमाणपत्र दिले जाते

व यालाच सामान्य भाषेमध्ये उद्योग आधार कार्ड म्हणतात. ज्या कंपन्यांची गुंतवणूक एक कोटी रुपयांपेक्षा कमी व वर्षाची उलाढाल 250 कोटी रुपयांपेक्षा कमी आहे अशा कंपन्या एमएसएमई अंतर्गत त्यांची व्यवसायाची नोंदणी करू शकतात.

 उद्योग आधारमुळे काय मिळतात फायदे?

1- तुमचा व्यवसायाच्या वाढीसाठी तुम्ही बँकेकडून कमी व्याजावर कर्ज घेऊ शकतात व सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कोणतेही तारण न देता तुम्हाला कर्ज मिळू शकते.

2- पेटंट नोंदणी करायची असेल तर यावर देखील तुम्हाला 50% पर्यंत सवलत उपलब्ध आहे.

3- ISO प्रमाणपत्र उपलब्ध होते.

4- थेट करामध्ये देखील फायदा मिळतो व विज बिलात सवलत मिळते.

5- सरकारी अनुदानासाठी तुम्ही पात्र होतात.

6- देशामध्ये ज्या ठिकाणी प्रदर्शने भरवली जातात व त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या उत्पादनांचा स्टॉल उभारायचा असेल तर त्याचा खर्च देखील सरकार करते.

7- सरकारी निविदा काढणे सोपे होते.

 उद्योग आधारसाठी कशी कराल नोंदणी?

1- याकरिता सर्वात आधी अधिकृत वेबसाईट msme.gov.in वर जावे व त्या ठिकाणी तुम्हाला Udyam Registration(MSME साठी ऑनलाईन नोंदणी) असे तळाशी लिहिलेले दिसेल व त्यावर क्लिक करावे.

2- त्यानंतर एक नवीन पेज उघडेल व त्या ठिकाणी तुम्हाला एमएसएमई/ उदयम नोंदणी प्रक्रिया लिहिलेली दिसेल व या ठिकाणी नवीन उद्योजकांसाठी वर क्लिक करा.

3- त्यानंतर एक नवीन पेज तुमच्यासमोर उघडेल व त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार क्रमांक आणि नाव लिहावे लागेल.

4- त्यानंतर खाली दिलेल्या निळ्या बॉक्समध्ये लिहिलेल्या व्हॅलिडेट अँड जनरेट ओटीपी वर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या आधारशी लिंक असलेल्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल व तो ओटीपी  दिलेल्या ठिकाणी टाईप करा.

5- त्यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण करून तुमच्या व्यवसायाची नोंदणी पूर्ण होते आणि बारा अंकी कार्ड क्रमांक म्हणजेच उद्योग आधार तयार होते.

 उद्योग आधार नोंदणी करिता आवश्यक असलेले तीन निकष

उद्योग आधार म्हणजेच एमएसएमईमध्ये नोंदणी करण्यासाठी तीन निकष महत्त्वाचे आहेत व ते प्रामुख्याने कंपनीची गुंतवणूक आणि वार्षिक उलाढाल यावर प्रामुख्याने अवलंबून आहे. यामध्ये

1- सूक्ष्म उपक्रम एक कोटी रुपयांपेक्षा कमी गुंतवणूक आणि पाच कोटी रुपयांपेक्षा कमी उलाढाल

2- लघुउद्योग दहा कोटी रुपयांपेक्षा कमी गुंतवणूक आणि 50 कोटी रुपयांपर्यंतचे उलाढाल

3- मध्यम उद्योग 50 कोटी रुपयांपेक्षा कमी गुंतवणूक आणि 250 कोटी रुपयांपर्यंतची उलाढाल