अवकाळीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करा राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र नागवडे यांची पालकमंत्र्यांकडे मागणी

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीगोंदा तालुक्यात मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी व वादळी पावसामुळे फळबागांच्या झालेल्या नुकसानीची तातडीने पाहाणी करुन पंचनामे करण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रदादा नागवडे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी व तहसीलदारांकडे केली आहे. नागवडे यांनी म्हटले आहे … Read more

टीव्हीएसने भारतात लॉन्च केली स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर! सिंगल चार्जवर देते 100 ते 150 किमीची रेंज, वाचा किंमत आणि वैशिष्ट्ये

tvs electric scooter

सध्या मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक कार, दुचाकी आणि स्कूटर्स उत्पादित केल्या जात असून त्याच्या माध्यमातून देखील इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनावर आणि वापराला प्रोत्साहन दिले जात आहे. कारण पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांचा कल आता इलेक्ट्रिक वाहनांकडे हळूहळू वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे वाहन निर्मिती क्षेत्रातील अनेक दिग्गज कंपन्या देखील आता इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीकडे मोठ्या प्रमाणावर … Read more

Ahmednagar Politics : जबरदस्त ! अहमदनगरमध्ये ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँग रूम’ला ट्रिपल लेयर प्रोटेक्शन, सीसीटीव्ही.. वेबकास्टिंग..पोलिसांसह सीआरपीएफ.. एकदा पहाच

Ahmednagar politics

Ahmednagar Politics : लोकसभा निवडणुकीसाठी अहमदनगर व शिर्डीसाठी मतदान झाले व त्यानंतर प्रशासनाने ईव्हीएम मशिन सर्व मतदान केंद्रांवरून आणल्यानंतर एमआयडीसीतील शासकीय गोडाऊन मध्ये ठेवले आहेत. जिल्हाभरातील मतदान प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. त्यामुळे सोमवारी (ता. १३) रात्री उशिरापर्यंत ईव्हीएम मशिन स्ट्रॉग रूमवर पोहोचल्या. या स्ट्रॉग रुमला तीन टप्प्यांत सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली. स्ट्राँग रुममध्ये केंद्रीय … Read more

गळफास घेत एकाची आत्महत्या ! पंचक्रोशीत खळबळ

Ahmednagar News

Ahmednagar News : तळेगाव दिघे येथील जोर्वेकर वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यादरम्यान स्टोन क्रशर परिसरात गळफास घेत एकाने आत्महत्या केली. भागवत बाळा दिघे (वय ४५), असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. काल मंगळवारी (दि. १४) दुपारच्या सुमारास ही घटना उघडकीस आल्याने पंचक्रोशीत खळबळ उडाली होती. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तळेगाव दिघे येथील रहिवासी भागवत बाळा दिघे यांचा … Read more

मध्यरात्री जोरदार अवकाळी पाऊस शेतकऱ्यांसह वीट उत्पादकांचे मोठे नुकसान

Ahmednagar News

Ahmednagar News : संगमनेर शहर व तालुक्यामध्ये काल मंगळवारी मध्यरात्री जोरदार अवकाळी पाऊस कोसळला. तब्बल दोन तास पडलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांसह तालुक्यातील वीट उत्पादकांचे मोठे नुकसान झाले. या पावसामुळे शहरातील काही भागांमध्ये १५ तास वीज परवठा विस्कळीत झाला. संगमनेर शहर व परिसरातील गावांमध्ये मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास अवकाळी पावसात प्रारंभ झाला. विजेच्या कडकडाटासह तब्बल दोन … Read more

Rahu Nakshatra Gochar : जुलैमध्ये उजळेल ‘या’ 3 राशींचे नशीब, पैशांचा पडेल पाऊस…

Rahu Nakshatra Gochar 2024

Rahu Nakshatra Gochar 2024 : वैदिक ज्योतिषात राहू ग्रहाला विशेष महत्व आहे. राहूच्या प्रत्येक चालीतील बदलाचा परिणाम मानवी जीवनावर दिसून येतो. राहू हा सगळ्यात क्रूर ग्रह मानला जातो, परंतु कुंडलीत त्याची मजबूत स्थिती व्यक्तीचे नशीब बदलून टाकते. राहू ग्रह कर्कश वाणी, प्रवास, चर्मरोग इत्यादींचा कारक मानला जातो. कुंडलीत राहूच्या मजबूत स्थितीमुळे व्यक्तीला अध्यात्माच्या क्षेत्रात यश … Read more

श्रीगोंद्याला वादळी वाऱ्यासह गारपिटीचा फटका; लाखो रुपयांचे नुकसान

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीगोंदा तालुक्यातील घोड पट्टयातील काही भागात वादळी वारा व अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा बसला. वादळ आणि गारपिटीमुळे चारापिके आणि विशेषतः फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी झाडे, महावितरणचे खांब उन्मळून पडले आहे. दरम्यान, प्रशासन मतदान प्रक्रियेत अडकल्याने नुकसानीचे पंचनामे होऊ शकले नाहीत. तालुक्यातील वांगदरी, लिपणगाव, शिरसगाव बोडखा, हंगेवाडी आदी भागात सोमवारी … Read more

काँग्रेस नेत्यांची लाजीरवाणी वक्तव्ये पाहिली तरी विरोधी पक्षाचा रामलल्लाला पुन्हा तंबूत पाठवण्याचा कट !

Maharashtra News

Maharashtra News : राम मंदिराबाबत काँग्रेस नेत्यांची लाजीरवाणी वक्तव्ये पाहिली तरी विरोधी पक्षाचा रामलल्लाला पुन्हा तंबूत पाठवण्याचा कट असल्याचे स्पष्ट होते, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. भारताला या वाईट प्रवृत्तींपासून मुक्त करण्याचा आपण संकल्प केल्याचे सांगत मोदींनी जनतेला या भ्रष्ट शक्तींना हटवण्याचे आवाहन केले. झारखंडमध्ये मंगळवारी प्रचारसभेत बोलताना मोदींनी राज्यातील सत्ताधारी झारखंड मुक्ती … Read more

Ahmednagar Politics : ‘अहमदनगर’ दक्षिणेत १९५२ नंतर पहिल्यांदाच ऐतिहासिक मतदान ! कुठे किती मतदान झाले? खरी आकडेवारी समोर

sujay vikhe

Ahmednagar Politics : अहमदनगर लोकसभा मतदारसंघांत १३ मे रोजी मतदन प्रक्रिया पार पडली. त्यानंतर अनेक अंदाजे आकडेवारी सगळीकडे सांगितली जात होती. आता मतदानाची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर लोकसभा मतदार संघात ६६.६१ टक्के मतदान झाले असल्याचे समोर आले आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघात १९५२ नंतर पहिल्यांदाच ६५ टक्क्यांच्या पुढे वाढ झाली आहे. यात पारनेर विधानसभा मतदार … Read more

तुमच्या फोनमध्ये ठेवा ‘महावितरण ॲप’! घरबसल्या मिळेल विजेचे अपडेट आणि मेसेज करून करता येईल नवीन विज जोडणी

mahavitaran

जेव्हा पावसाळ्याचे दिवस सुरू होतात तेव्हा सुरुवातीला वादळी वारे व विजांच्या  गडगडाटासह जोराचा पाऊस होत असतो व अशा परिस्थितीमध्ये अनेक ठिकाणी विजेचे पोल पडणे तसेच तारा पडणे, वारंवार वीज खंडित होणे इत्यादी समस्या या कालावधीत मोठ्या प्रमाणावर घडतात. त्यामुळे बऱ्याचदा अशा परिस्थितीत कोणत्या ठिकाणी काय समस्या आली आहे याबद्दल आपल्याला काहीही कळत नाही. म्हणजेच एकंदरीत … Read more

मतदान करताना चूक झाल्यास किंमत मोजावी लागेल – शरद पवार

Maharashtra News

Maharashtra News : मोदी काळात सत्तेचा गैरवापर होत असून मोदींवर टीका करणाऱ्यांना तुरुंगात टाकले जात आहे. ते महाराष्ट्रातील कारखाने गुजरातमध्ये घेऊन निघाले आहेत. त्यामुळे आताची निवडणूक साधी सोपी राहील नसून चूक झाली तर त्याची जबरदस्त किंमत आपल्याला चुकवावी लागेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) अध्यक्ष शरद पवार यांनी दिला. ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे उमेदवार … Read more

Uddhav Thackeray : कितीही डबे लावा थापांचे इंजिन पुढे जाणार नाही

Uddhav Thackeray

Uddhav Thackeray : दहा वर्षांत नुसते थापांचे इंजिन सुरू आहे. या इंजिनाला कितीही डबे लावा, गाडी पुढे जाणार नाही, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावला. महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कामडी यांच्या प्रचारासाठी मंगळवारी संध्याकाळी वसईच्या माणिकपूर येथील मैदानात सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. भाजप बुरसटलेल्या मानसिकतेचा पक्ष असून मला … Read more

तीव्र पाणीटंचाई ! विकतचे पाणी पिण्याची वेळ,महिलांमध्ये नाराजी

Maharashtra News

Maharashtra News : गोदावरीचे आवर्तन लांबल्याने पुणतांबा गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नागरिकांना पाणी विकत घेण्याची वेळ आली असून महिलांमध्ये नाराजी पसरली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने पर्यायी पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था करावी तसेच गोदवरी कालव्याचे आवर्तन लवकर सोडावे, अशी मागणी महिलांमधून होत आहे. पुणतांब्याचे राजकारण गेल्या अनेक वर्षांपासून पाणीप्रश्नावर सुरू आहे. नुकत्याच अंदाजे ३२ कोटीच्या पाणीपुरवठा … Read more

Unseasonal Rain : अवकाळी पावसामुळे आंब्याचे नुकसान,शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी

Unseasonal Rain

Unseasonal Rain : गेल्या दोन दिवसांपासून नगर जिल्ह्यात सुरू असलेल्या वादळी अवकाळी पावसामुळे आंब्याच्या बागासह भाजीपाला पिकाचे मोठे नुकसान झाले. मागील दोन महिन्यांपासून उन्हाचा पारा वाढला होता. त्यामुळे उष्णतेचे प्रमाण वाढले होते; मात्र नुकत्याच झालेल्या वादळी पावसाने काहिसा दिलासा मिळणार आहे. वादळी वाऱ्यासह अवकाळीमुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. सोमवारी मध्यरात्री झालेल्या वादळामुळे … Read more

EPFO News: ‘या’ महिन्यात मिळणार पीएफवरील व्याजाचा लाभ! जाणून घ्या खात्यात किती होणार पैसे जमा?

epfo news

EPFO News:- कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या ईपीएफओ अर्थात पीएफ खात्यामध्ये जी काही रक्कम जमा होते त्या रकमेवर ठराविक अशा दराने व्याज दिले जाते. आपल्याला माहित आहे की जे कर्मचारी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे सदस्य आहेत त्यांचे या ईपीएफओच्या नियमानुसार कर्मचाऱ्यांचा बेसिक पे आणि महागाई भत्ता यांच्या 12% हिस्सा प्रॉव्हिडंट फंड अर्थात … Read more

Water Scarcity : अहमदनगर जिल्ह्यातील ह्या तालुक्यात भीषण पाणी टंचाई ! लोकांवर स्थलांतराची वेळ

Water Scarcity

Water Scarcity : निवडणुकीचे वारे शांत झाल्यानंतर पाणीटंचाईची तीव्रता अधिक तीव्रतेने पुढे आली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी लोकांवर स्थलांतराची वेळ आली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक टँकर पाथर्डी तालुक्‍यात सुरू असून, टॅंकरने तालुक्‍यात शंभरी गाठली आहे. टँकर पुरवठा ठेकेदाराच्या मनमानी कारभारापुढे प्रशासनाने हात टेकले असून, जिल्हाधिकार्‍यांनी ठेकेदाराविरुद्ध कारवाई करण्याची नागरिकांची मागणी आहे. तालुक्‍यात यापूर्वी एवढी भीषण पाणी टंचाई … Read more

जो मुंबईकर बाहेर फेकला आहे, त्याला परत आणण्याचे काम आपले सरकार करेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Maharashtra News

Maharashtra News : निवडणूक आली की काहीजण मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, अशी आवई उठवतात. मात्र मुंबईकरांच्या मतांवर डोळा ठेवून २५ वर्षे मुंबईची सत्ता उपभोगणाऱ्यांनी मुंबईसाठी काय केले ? असा सवाल करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर मंगळवारी टीका केली. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची, महायुतीची मुंबई आहे. त्यामुळे जोवर चंद्र, सूर्य आहेत, तोवर … Read more

विधान परिषद शिक्षक मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय !

Ahmednagar Breaking

महाराष्ट्र विधान परिषदेच्या कोकण व मुंबई विभाग पदवीधर मतदारसंघ तसेच मुंबई व नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघातील रिक्त झालेल्या जागांकरिता भारतीय निवडणूक आयोगाने दि. 8 मे 2024 रोजी द्विवार्षिक निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले होते. परंतु उन्हाळ्याच्या सुट्ट्या लक्षात घेता शाळांमधील उन्हाळी सुट्ट्या संपल्यानंतर ही निवडणूक घेण्यात यावी, असे निवेदन आयोगाकडे प्राप्त झाले होते. या निवेदनाचा विचार … Read more